किंग खान शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. पण याचदरम्यान शाहरुखने एक वेगळाच खुलासा करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. होय,आर्यनला अभिनयात अजिबात रस नाही. तो अभिनयाऐवजी दिग्दर्शन करेल, असे शाहरूखने स्पष्ट केले होते. पण याचदरम्यान आर्यन खान ‘द लायन किंग’ नावाच्या चित्रपटातून डेब्यू करतोय, अशी बातमी आली आणि ही बातमी वा-याच्या वेगाने पसरली. आता ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी कन्फर्म केली आहे. सोशल मीडियावर एक ट्विट करत त्यांनी ही ‘बिग न्यूज’ शेअर केली आहे.
कन्फर्म! बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमधून होणार आर्यन खानचा धमाकेदार डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 12:43 IST
आर्यन खान ‘द लायन किंग’ नावाच्या चित्रपटातून डेब्यू करतोय, अशी बातमी आली आणि ही बातमी वा-याच्या वेगाने पसरली. आता ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी कन्फर्म केली आहे.
कन्फर्म! बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमधून होणार आर्यन खानचा धमाकेदार डेब्यू!!
ठळक मुद्देडिज्नी कंपनी ‘द लायन किंग’ या सुपरहिट चित्रपटाची नवी आवृत्ती घेऊन येतोय. यात अॅनिमेशनच्या नव्या तंत्राचा वापर करण्यात आला आहे.