Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अशी झालीय अंकिता लोखंडेची अवस्था, आरती सिंगने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 19:23 IST

अंकिता सुशांतच्या कुटुंबीयांसुद्धा भेटायला गेली होती.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाचा त्याचे मित्र, कुटूंब आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या निधनाच्या अनेक दिवसानंतरही त्याला मिस केले जाते आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंट अंकिता लोखंडे दु:खात आहे. अंकिता सुशांतच्या कुटुंबीयांसुद्धा भेटायला गेली होती. अंकिता अद्याप आपली कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. अंकिताच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताची वाईट अवस्था झाली आहे. 

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आरती सिंगने नुकताच अंकिताशी संवाद साधला. एका मुलाखती दरम्यान आरतीने सांगितले की, सुशांतच्या निधनाच्या दु:खातून अंकिता अद्याप सावरलेली नाही. आरती म्हणाली, अंकिताच्या माध्यमातूनच मी सुशांतला ओळखायचे. तो एक खुप चांगला मुलगा होता. मी अंकिताशी बोलले आणिविचारले की ती ठीक आहे ना. अंकिताला सध्या तिची स्पेस हवी आहे आणि मी ही तिला तिच्या स्पेसमध्येच राहु दिले. 

 जबाब नोंदवण्यासाठी संजय लीला भन्साळी आज वांद्रे पोलिस ठाण्यात गेले होते चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले होते. भन्साळी यांना पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत. त्यांच्या दबावातून संजय लीला भन्साळीच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याजागी रणवीर सिंगला लीड रोल देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार याप्रकरणी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे पोलीस चौकशी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे