Join us
Daily Top 2Weekly Top 5

असूर वेबसिरिजचे फॅन असाल तर नक्कीच वाचा ही बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 15:47 IST

या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे. 

ठळक मुद्देया वेबसिरिजमध्ये अर्शदसोबतच वरुण सोबती, अमेय वाघ, अनुप्रिया गोएंका, शारिब हाश्मी, गौरव अरोरा, दीपक काजिर यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

असूर या वेबसिरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या वेबसिरिजमध्ये अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसला होता. या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे. 

असूर या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. तसेच ही वेबसिरिज दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे. या वेबसिरिजमधील कलाकारांच्या अभिनयासोबतच या वेबसिरिजच्या लिखाणाची चांगलीच चर्चा झाली होती. या वेबसिरिजचे लिखाण गौरव शुक्ला, विनय छावल व निरेन भट्ट यांनी केले होते तर ओनी सेनने या वेबसिरिजचे दिग्दर्शन केले होते. 

या वेबसिरिजमध्ये अर्शदसोबतच वरुण सोबती, अमेय वाघ, अनुप्रिया गोएंका, शारिब हाश्मी, गौरव अरोरा, दीपक काजिर यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अर्शदने या वेबसिरिजद्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले असून त्याच्या पहिल्याच वेबसिरिजला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती लाभली होती.

टॅग्स :अर्शद वारसी