'बिग बॉस १९' हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. घरात शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आणि टॉप ५मध्ये स्थान मिळवण्यासाठी घरातीस सदस्य प्रयत्न करत आहेत. बिग बॉसच्या घरातील पहिल्या दिवसापासून अमाल मलिक चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये गौरव खन्ना आणि अमाल मलिक यांच्यात नेपोटीझम या विषयावर जोरदार वाद झाला. यावेळी अमालनं भाऊ अरमानच्या संघर्षाबद्दल आणि त्याने अनुभवलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. गौरवने जेव्हा म्हटले की, "जिथे तुमचा संघर्ष सुरू होतो, तिथे आमची आकांक्षा आहे," तेव्हा अमालने उत्तर दिले की, "ज्याप्रमाणे एक सामान्य माणूस मेहबूब स्टुडिओबाहेर उभा असतो, त्याचप्रमाणे माझा भाऊ आणि आई उभे राहिले, यात काही फरक नव्हता". यावर आता अरमाननं भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
'बिग बॉस'मध्ये नेपोटिझमवरुन ट्रोल झाल्यावर अरमान मलिकानं ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं लिहलं, "आपल्या प्रवासाला कधीच कुणी पूर्णपणे समजू शकणार नाही आणि ते ठीक आहे. दोन लहान, निरागस मुलांपासून आजच्या दिवसापर्यंत… आपण दोघांनी एकत्र किती वादळं झेलली, किती लढाया लढल्या, हे फक्त आपणच जाणतो. लव्ह यू अमाल मलिक... बिग बॉसच्या घरात माझ्यासाठी उभं राहिल्याबद्दल धन्यवाद, पण, आपल्याला कुणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. आपल्या गाण्यांमध्येच आपली कहाणी दडलेली आहे" असं म्हटलं.
याशिवाय, अरमाननं आणखी एका पोस्टमध्ये अमालला मतदान करण्याचे आवाहन चाहत्यांना केले. अमाल मलिक 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. पहिल्या दिवसापासूनच त्याने घरात स्वत:चं स्थान बनवण्यास सुरूवात केली. टास्कमध्येही अमाल स्ट्रॅटेजी प्लॅन करताना दिसतो. आता तो 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत कुठपर्यंत टिकून राहतो हे पाहावं लागेल.
Web Summary : Armaan Malik defends brother Amaal against nepotism charges on 'Bigg Boss 19,' citing their shared struggles. He thanks Amaal for his support, emphasizing their bond and resilience, stating their music tells their story.
Web Summary : 'बिग बॉस 19' में अमाल मलिक पर भाई-भतीजावाद के आरोपों के बाद अरमान मलिक ने समर्थन किया। उन्होंने उनके संघर्षों का हवाला देते हुए अमाल के समर्थन के लिए आभार व्यक्त किया और कहा कि उनका संगीत ही उनकी कहानी है।