मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आज गुरुवारी सानिया चांडोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या खास प्रसंगी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी क्रीडा क्षेत्रासोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे बच्चन कुटुंब. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी लग्नाला उपस्थिती लावली. मात्र, त्यांनी पापाराझींसमोर पोझ देणे टाळले आणि बाहेर उपस्थित असलेल्या काही लोकांशी संवाद साधून ते थेट हॉटेलच्या आत गेले. दुसरीकडे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मात्र पापाराझींना आनंदाने पोझ दिल्या. यावेळी हे दोघेही नेहमीप्रमाणे 'स्टनिंग' दिसत होते.
बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींमध्ये अभिनेता फरहान अख्तर हा चुडीदार, कुर्ता आणि नेहरू जॅकेट अशा पारंपरिक पेहरावात अतिशय देखणा दिसत होता. सहसा कोणत्याही कार्यक्रमाला पत्नी शिबानी दांडेकरसोबत दिसणारा फरहान यावेळी मात्र एकटाच या सोहळ्याला पोहोचला होता. याशिवाय दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही या लग्नसोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावर सध्या या शाही लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. अर्जुन आणि सानियाला आशीर्वाद देण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या निर्मात्यांनी आणि कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावून लग्नाची शोभा वाढवली. सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकाच्या या आयुष्यातील नवीन सुरुवातीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Web Summary : Arjun Tendulkar married Sania Chandok in Mumbai. The Bachchan family attended; Amitabh & Jaya avoided paparazzi, while Abhishek & Aishwarya posed. Farhan Akhtar and Ashutosh Gowariker also attended the wedding, pictures are viral on social media.
Web Summary : अर्जुन तेंदुलकर ने मुंबई में सानिया चांदोक से शादी की। बच्चन परिवार शामिल हुआ; अमिताभ और जया ने पपराज़ी से परहेज किया, जबकि अभिषेक और ऐश्वर्या ने पोज़ दिए। फरहान अख्तर और आशुतोष गोवारिकर भी शादी में शामिल हुए, तस्वीरें सोशल मीडिया पर वायरल हैं।