Join us

​अर्जुन रामपाल दाखविणार ‘डॅडी’ची दुनिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 10:04 IST

मुंबईचे अंडरवर्ल्ड चित्रपट निर्मात्यांसाठी क था पुरविणारी खाणच ठरली. यातच एका नव्या चित्रपटांची भर पडते आहे. अर्जुन रामपालची प्रमुख ...

मुंबईचे अंडरवर्ल्ड चित्रपट निर्मात्यांसाठी क था पुरविणारी खाणच ठरली. यातच एका नव्या चित्रपटांची भर पडते आहे. अर्जुन रामपालची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅडी’ या चित्रपटातून मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील अरुण गवळीची दुनिया तो उलगडताना दिसेल. या चित्रपटाचा पहिला व्हिडीओ अर्जुनने आपल्या ट्विटरवरून शेअर केले आहे. बॉलिवूड चित्रपटातून गुन्हेगारी विश्वातील अनेक व्यक्तीच्या कथा प्रेक्षकांना पहायला मिळाल्या आहेत. रामगोपाल वर्मा यांच्यापासून ते थेट रोमाँटिक चित्रपटासाठी ख्यात असलेल्या यशराज व धर्मा प्रोडक्शन यांनी देखील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित व्यक्तीवर चित्रपटांची निर्मिती केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘दगडी चाळ’वर चित्रपट तयार करण्यात येत असून त्यात दडलेली अरुण गवळीची गुन्हेगारी दुनिया ‘डॅडी’ या चित्रपटातून दाखविली जाणार आहे. }}}} ">http://या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातला अर्जुनने त्याच्या ट्विटरवरून त्याचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे. त्याने ट्विटरवर अरुण गवळीचा तरुणपणीचा फोटो शेअर केला. त्याचबरोबर त्याचाही चित्रपटातला लुक त्याने दाखवला आहे. हे दोन्ही फोटो पाहताना त्यांच्यात फारच साम्य दिसून येते. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांच्या मनातली या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता अजूनच वाढली असेल यात काही शंका नाही.या चित्रपटाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती गुफंण्यात आली आहे. दाऊदच्या भूमिकेसाठी फरहान अख्तरची निवड करण्यात आल्याचे कळते. दाऊद आणि डॅडी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. अभिनेता अर्जुन रामपाल आणि फरहान अख्तरची  यांनी एकत्र ‘रॉक आॅन’, ‘रॉक आॅन २’ हे चित्रपट केले आहेत.  इटलीतील रंगभूषाकाराने अर्जुनच्या रंगभूषेचे काम हाती घेतले होते.