Join us

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याचा पाय झाला फ्रॅक्चर, झालीय वाईट अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 15:24 IST

या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो कारमधून उतरल्यानंतर काठीच्या आधारे चालत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअर्जुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अर्जुन कारमधून उतरल्यानंतर काठीच्या आधारे चालत असल्याचे दिसून येत आहे.

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलीच चिंता लागलेली आहे. अभिनेता अर्जुन रामपालला नुकतेच त्याच्या घराच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यावेळी काठीचा आधार घेऊन तो चालत असल्याचे दिसले.

अर्जुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अर्जुन कारमधून उतरल्यानंतर काठीच्या आधारे चालत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओत अर्जुनने व्हाइट टी शर्ट आणि शॉट्स घातले आहेत. हा व्हिडिओ मानव मंगलानीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अर्जुन रामपालची ही अवस्था पाहून त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. अर्जुन कपूरने नुकताच कोरोना विरूद्ध लढा जिंकला आहे. त्यानेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याविषयी सांगितले होते. 

अर्जुनला कशामुळे दुखापत झाली हे अद्याप तरी कळू शकलेले नाही. 

टॅग्स :अर्जुन रामपाल