Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! अर्जुन रामपालकडे गुडन्यूज, लग्नाआधीच गर्लफ्रेंड गॅबरिला प्रेग्नेंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 10:26 IST

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने काही दिवसांपूर्वीच साऊथ अफ्रिकन मॉडल गॅबरिलासोबत आपल्या नात्याची कबुली दिली होती.

ठळक मुद्देअर्जुनने हा फोटो शेअर केल्यावर अनेक सिलेब्सने त्याचे अभिनंदन केले आहे.दोघे पाली हिलच्या एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत आहेत

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने काही दिवसांपूर्वीच साऊथ अफ्रिकन मॉडल गॅबरिलासोबत आपल्या नात्याची कबुली दिली होती. मंगळवारी अर्जुन रामपालने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड गॅबरिला प्रेग्नेंट असल्याची बातमी आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. अर्जुनने गॅबरिला सोबतचा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे ज्यात तिचे बेबी बम्प दिसतायेत. अर्जुनने हा फोटो शेअर केल्यावर अनेक सिलेब्सने त्याचे अभिनंदन केले आहे.

अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्यांची नावं माहिका आणि मायरा आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला.    

गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅबरिलासोबत बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता.दोघे पाली हिलच्या एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. पत्नी मेहर जेसिकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन  मॉडेल गॅबरिलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघेही एकत्र दिसू लागलेत. 

गॅबरिला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्सऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.   

टॅग्स :अर्जुन रामपाल