Join us

अर्जुन-मलायकाच्या नात्यावर ‘हे’ बोलली त्याची बहीण अंशुला कपूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 19:17 IST

अर्जुनपेक्षा मला ती पालक म्हणून जास्त जवळची वाटते. कधी मी तिची आई म्हणून काळजी घेते तर कधी मी तिची घेते. पण, आम्ही भाऊ-बहीण असूनही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात दखल देत नाहीत.

बॉलिवूडमध्ये सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा  ही जोडी सर्वांत जास्त चर्चेत आहे. त्याच्या अफेअरपासून ते त्यांच्या लग्नापर्यंतच्या बातम्यांमुळे ते कायम चर्चेत आहेत. ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असून त्यांच्या दोघांच्याही घरून त्यांच्या नात्याला शिक्कामोर्तब झाला आहे. अशातच अर्जुनची लाडकी बहीण अंशुला मलायकासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल बोलली. 

अंशुला कपूर ही मीडिया फ्रेंडली नाही. तिला कॅमेऱ्यासमोर व्यक्त होणं जमत नाही. पण, अलीकडेच तिने तिच्या कुटुंबातील काही सदस्यांच्याबाबतीत खुलेपणाने बोलली. तिला मलायकासोबतच्या अर्जुनच्या नात्याबद्दल विचारले असता ती म्हणते,‘अर्जुनपेक्षा मला ती पालक म्हणून जास्त जवळची वाटते. कधी मी तिची आई म्हणून काळजी घेते तर कधी मी तिची घेते. पण, आम्ही भाऊ-बहीण असूनही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात दखल देत नाहीत. तो माझ्यापेक्षा ६ वर्षांनी लहान आहे. या नात्यांवर चर्चा करणं, मला आवडत नाही.’

तिची सावत्र बहीण जान्हवी-खुशी यांच्याबद्दलही बोलली. ती म्हणते,‘आमचं नातं हे दुसऱ्या  भाऊ-बहिणींसारखंच आहे. आम्ही सोबत डिनर, हँगआऊट, मुव्ही डेटवर जातो. जेव्हा आम्ही व्यस्त असतो तेव्हा एकमेकांना मेसेज करतो.’

वडील बोनी कपूर यांच्याबद्दल ती बोलली. ती सांगते,‘पापा खूपच कडक आहेत. आम्ही जर एखादा फोटो व्हॉटस अ‍ॅपवर पाठवला. तर ते लगेचच तो टाकू नका म्हणून सांगतात. त्यांना प्रत्येक बाब ही परफेक्टच लागते. ते अर्जुन भैय्यापेक्षाही जास्त स्पष्ट आहेत.’    

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा