अर्जुन कपूर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यापैंकी एक आहे. 'इश्कजादे' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून त्याने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आतापर्यंत अर्जुन कपूरने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. अर्जुन कपूर हा त्याच्या आईच्या, म्हणजेच मोना कपूर यांच्या किती जवळ होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मंगळवारी मोना कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनने सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. अर्जूनच्या या पोस्टवर चाहत्यांनी भावुक कमेंट केल्यात. एवढेच नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिनंदेखील खास कमेंट केली आहे.
अर्जुनने इंस्टाग्रामवर त्याच्या आईसोबतचा एक खास फोटो कोलाज शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, आज मला तुझी खूप आठवण येत आहे. अलिकडे आयुष्य माझ्यासाठी थोडं क्रूर राहिलं आहे, पण ठीक आहे. मी यापूर्वीही अनेक संकटांचा सामना केला आहे आणि मी पुन्हा उभा राहीन. कारण, परिस्थितीशी सन्मानाने आणि धैर्याने कसं लढायचं, हे तूच मला शिकवलं आहेस. आपण दोघे नेहमीच एकत्र आहोत आणि एक दिवस पुन्हा तुझा वाढदिवस एकत्र साजरा करू".
अर्जुनच्या या भावनिक पोस्टवर कपूर कुटुंबासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. जिनिलिया देशमुख, जान्हवी कपूर, खुशी कपूर, संजय कपूर, रकुल प्रीत सिंग आणि अपारशक्ती खुराणा यांनी हार्ट इमोजी पोस्ट करत अर्जुनला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, मलायकानंही अर्जूनच्या पोस्टवर हार्ट एमोजी पोस्ट केलंय. तसेच गेल्या काही काळापासून अर्जुनला सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटांमुळे ट्रोल केले जात होते, मात्र या पोस्टवर चाहत्यांनी नकारात्मक कमेंट्स न करण्याचे आवाहन एकमेकांना केले आहे.
अर्जुन आणि अंशुला कपूर हा बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे. बोनी कपूर यांनी १९८३ साली मोना कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर १६ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. मोना कपूर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरा विवाह केला होता. दरम्यान, २५ मार्च २०१२ रोजी अर्जुनची आई आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची पत्नी मोना कपूर यांचं निधन झालं. दरम्यान, अर्जुन कपूर अलीकडेच भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत "मेरे हसबंड की बीवी" या चित्रपटात दिसला होता.
Web Summary : Arjun Kapoor shared a touching post on his mother's birthday, remembering her strength and guidance. Celebrities, including Malaika Arora, offered support. Fans rallied against negativity due to recent film criticism, focusing on the emotional tribute.
Web Summary : अर्जुन कपूर ने अपनी माँ के जन्मदिन पर एक भावुक पोस्ट साझा किया, जिसमें उन्होंने उनकी ताकत और मार्गदर्शन को याद किया। मलाइका अरोड़ा सहित कई हस्तियों ने समर्थन दिया। हालिया फिल्म आलोचना के कारण प्रशंसकों ने नकारात्मकता के खिलाफ रैली की और भावनात्मक श्रद्धांजलि पर ध्यान केंद्रित किया।