Join us

अर्जुन-अंशुला जान्हवी कपूरच्या प्रेमात! ‘धडक’चे ट्रेलर पाहून म्हटली एवढी मोठी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:16 IST

काल   ‘धडक’चा ट्रेलर आऊट झाला आणि सगळीकडे जान्हवी कपूरची प्रशंसा होऊ लागली. या प्रशंसा करणा-यांमध्ये सगळ्यात आघाडीवर होते ते ...

काल   ‘धडक’चा ट्रेलर आऊट झाला आणि सगळीकडे जान्हवी कपूरची प्रशंसा होऊ लागली. या प्रशंसा करणा-यांमध्ये सगळ्यात आघाडीवर होते ते जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर आणि सावत्र बहिण अंशुला कपूर. होय, दोघांनीही ‘धडक’चा ट्रेलर पाहिला आणि ते जणू जान्हवीच्या प्रेमातचं पडले. हे प्रेम त्यांनी सोशल मीडियाद्वारे बोलून दाखवले. अर्जुनने तर जान्हवीला मनापासून शाब्बासकी दिली.‘आजपासून तुझा नवा प्रवास सुरु झाला आहे.‘धडक’च्या ट्रेलरमध्ये तू आणि ईशान खट्टर दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहात. तुला आणि ‘धडक’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा’, असे त्याने लिहिलेयं. काल ट्रेलर लॉन्चपूर्वीही अर्जुनने जान्हवीसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. मी मुंबईत तुझ्यासोबत नाही, यासाठी माफी मागतो. पण मी कायम तुझ्या सोबत आहे. जराही चिंता करू नकोस, असे त्याने तिला मध्ये लिहिले होते.  अंशुला कपूरने ‘वाह, क्यूटी... ’ इथपासून सुरूवात केली. ‘आहहा मेरी क्यूटी, जान्हवी जगासाठी तुझ्या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झालाय आणि माझा ऊर आनंदाने आणि अभिमानाने भरून येतोय. ट्रेलमधील जानू आणि ईशान तुम्हा दोघांना बघून मी अक्षरश: तुमच्यावर भाळले आहे. ट्रेलर शानदार आहे. २० जुलै इतकी लांब का आहे. ‘धडक’साठी मी सुपरडुपर एक्साईटेड आहे,’ असे अंशुलाने लिहिले आहे. अंशुलाच्या या मॅसेला रिप्लाय करताना जान्हवीने ‘आय लव्ह यू’ म्हटले आहे.ALSO READ : ​ जान्हवी, मला माफ कर...! ‘धडक’च्या ट्रेलर रिलीजपूर्वी अर्जुन कपूरचा बहिणीसाठी भावूक संदेश!!‘धडक’ चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये जान्हवी व ईशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत. ट्रेलरमधील जान्हवी  ईशान यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात, पण जान्हवी आणि ईशान या नव्या-को-या जोडीला पाहणे, एक नवा अनुभव आहे तुम्हाला ठाऊक आहेच की, जान्हवीचा हा पहिला चित्रपट आहे. पण ईशानचा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी ईशानचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ रिलीज झाला आहे.