Arijit Singh Love Story : आपल्या दर्दभऱ्या आवाजाने साऱ्या जगाला रडवणारा अरिजीत सिंग सध्या चर्चेत आहे. काल अरिजीत सिंगने एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना व संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यापुढे चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करणार नसल्याचं त्याने जाहीर केलं आहे. अरिजीत सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट केली आहे. यानंतर अरिजीतचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. त्याच्या गाण्यांप्रमाणेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील खुपच रंजक आहे. अनेकांना माहीत नाही की, करोडो हृदयांवर राज्य करणाऱ्या या गायकाचे पहिले लग्न अवघ्या एका वर्षातच मोडलं होतं.
२००५ मध्ये 'फेम गुरुकुल' या रिअॅलिटी शोमधून अरिजीत घराघरात पोहोचला. याच शोमध्ये त्याची भेट रूपरेखा बॅनर्जी हिच्याशी झाली. दोघांमध्ये प्रेम जुळले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अवघ्या एका वर्षातच त्यांच्यात खटके उडू लागले आणि हे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचलं. या धक्क्याने अरिजीत पूर्णपणे कोलमडून गेला होता.
बालपणीच्या मैत्रिणीने सावरलंपहिलं लग्न मोडल्यानंतर अरिजीत मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. याच काळात त्याच्या आयुष्यात बालपणीची मैत्रीण कोयल रॉय हिची पुन्हा एन्ट्री झाली. कोयलचेही पहिले लग्न यशस्वी झाले नव्हते आणि तिला एक मुलगी होती. एकमेकांचे दुःख समजून घेत असतानाच त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अरिजीतने कोयलच्या मुलीलाही आपले नाव देत या नात्याचा मनापासून स्वीकार केला.
'तुम ही हो' गाणं आणि फिल्मी प्रपोजलअरिजीतने कोयलला प्रपोज करण्यासाठी त्याचे सर्वात गाजलेले गाणे "तुम ही हो" निवडले होते. असं म्हणतात की, हे गाणे त्याने कोयललाच समर्पित केलं होतं. २० जानेवारी २०१४ रोजी पश्चिम बंगालमधील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांनी लग्न केलं. विशेष म्हणजे, अनेक वर्षे अरिजीतने आपले हे दुसरे लग्न जगापासून लपवून ठेवलं होतं. अफाट प्रसिद्धी आणि पैसा असूनही अरिजीत आजही साधे जीवन जगतो. सध्या तो पत्नी कोयल आणि तीन मुलांसह सुखी संसार करत आहे.
Web Summary : Arijit Singh's first marriage ended in a year. He then found love with childhood friend Koyel Roy, who also had a daughter. They married in 2014 and are happily married with three children, keeping their life private.
Web Summary : अरिजीत सिंह की पहली शादी एक साल में ही टूट गई। फिर उन्हें बचपन की दोस्त कोयल रॉय से प्यार हो गया, जिनकी एक बेटी भी थी। उन्होंने 2014 में शादी की और तीन बच्चों के साथ खुशी से जीवन बिता रहे हैं।