Join us

अरिजित सिंगचा हा साधेपणा पाहून पडाल त्याच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 17:49 IST

अरिजितचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरून अरिजित सिंगचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

ठळक मुद्देअरिजितच्या व्हायरल झालेल्या फोटोत आपल्याला तो, नेहा कक्कर, बादशहा, प्रीतम यांना पाहायला मिळत आहे. या सगळ्यांनी ब्रँडेड कपडे आणि ब्रँडेड शूज घातले आहेत. पण या सगळ्यात अरिजित अपवाद ठरला आहे.

कोणताही सेलिब्रेटी असो, तो ब्रँडेड कपड्याच्या प्रेमात असतो. तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चांगले कसे दिसावे यासाठी प्रयत्न करत असतो. पण यासाठी अरिजित सिंग अपवाद ठरला आहे. अरिजितचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरून अरिजित सिंगचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

अरिजितच्या व्हायरल झालेल्या फोटोत आपल्याला तो, नेहा कक्कर, बादशहा, प्रीतम यांना पाहायला मिळत आहे. या सगळ्यांनी ब्रँडेड कपडे आणि ब्रँडेड शूज घातले आहेत. पण या सगळ्यात अरिजित अपवाद ठरला आहे. त्याने अतिशय साधे कपडे आणि त्यावर साध्या चप्पला घातल्या असून यासाठी सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. लोक चांगले दिसण्यासाठी ब्रँडेड कपडे घालतात, पण यास अरिजित अपवाद असून अरिजित अतिशय साधा आणि खूप चांगल्या मनाचा असल्याचे त्याचे चाहते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

अरिजित सिंगने फिर ले आया दिल, तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे, छन्ना मेरेया यांसारखी अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिलीत. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे तर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अरिजीत सिंहने फेम गुरूकुल या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या रिअ‍ॅलिटी शो चे विजेतेपद त्याला मिळवता आले नाही. पण या रिअ‍ॅलिटी शो नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली. सावरियाँ या चित्रपटातील एक गाणे त्याने गायले होते. पण काही कारणास्तव हे प्रदर्शित झाले नाही. पण यानंतर त्याला कामे मिळत गेली. आज अरिजीतने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत.

टॅग्स :अरिजीत सिंह