Join us  

'लहान मुलगी आहेस का?' एअरपोर्टवर केलेल्या 'त्या' कृतीमुळे अरबाजची पत्नी शूरा खान ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 10:53 AM

Shura khan: लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी शूरा आणि अरबाज स्पॉट झाले.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) याने मागच्या वर्षी २४ डिसेंबर २०२३ रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खान (Shura Khan) हिच्यासोबत निकाह केला. अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. त्यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी सार्वजनिक ठिकाणी कॅमेरासमोर आली. नुकतंच या दोघांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. मात्र, एअरपोर्टवर शूराने केलेल्या एका कृतीमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं.

अरबाज आणि शूरा लग्नानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्हेकेशनला गेले आहेत. यावेळी या दोघांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी नेहमीप्रमाणे शूरा कॅमेरापासून दूर पळताना दिसून आली. इतकंच नाही तर तिने पापाराझींना फोटोसाठी पोझही देण्यास नकार केला. विशेष म्हणजे यावेळी तिने जे केलं ते पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना लहान मुलांसोबत केली आहे.

पापाराझींपासून दूर पळण्यासाठी शूराने तिच्या चेहरा टोपीने झाकला होता. इतकंच नाही तर ती संपूर्ण एअरपोर्टवर अरबाजचा हात धरुन चाल होती. परंतु, अरबाजने सांगितल्यानंतर तिने फोटोग्राफर्सला फोटो काढू दिले. विशेष म्हणजे अरबाजचा हात धरुन चालणं आणि त्याने सांगितल्यानंतर फोटोसाठी पोझ देणं तिचं हे वागणं पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.

काय म्हणाले ट्रोलर्स?

'हे कोणाचं मूल आहे' , असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'बाप-लेकीची जोडी', 'इतक्या चांगल्या मुलीला डेट केल्यानंतर अरबाजने हिची निवड केली हद्द आहे बाबा', 'ही त्याच्यापुढे एखाद्या लहान मुलीसारखीच वाटतीये', लहान मुलगी आहेस का?, अशा कितीतरी कमेंट नेटकऱ्यांनी करत त्यांना ट्रोल केलं आहे.

दरम्यान, २४ डिसेंबर रोजी शूरा आणि अरबाजने सिक्रेट वेडिंग केलं. अर्पिताच्या घरी त्यांचा निकाह सोहळा पार पडला.शूरासोबत लग्न करण्यापूर्वी अरबाजने मलायका अरोरासोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१७ मध्ये ते विभक्त झाले.

टॅग्स :अरबाज खानबॉलिवूडमलायका अरोरासेलिब्रिटी