Join us  

'या' व्यक्तीने रागाच्या भरात थेट 'दबंग' सलमान खानच्या कानशिलात लगावली होती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 11:56 AM

बॉलिवूडमध्ये सलमान खानचा एक दरारा आहे.

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नक्कीच बघायला मिळते. बॉलिवूडमध्ये सलमान खानचा एक दरारा आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्याशी अदबीनं बोलतो. त्याच्याशी पंगा घेण्याची हिंमत अख्ख्या बॉलिवूडमध्ये कुणातच नाही. पण, तुम्हाला माहिती आहे का एक अशी व्यक्ती आहे जिनं रागाच्या भरात थेट सलमान खानच्या कानशिलात लगावली होती. याचा खुलासा खुद्दल सलमान खानचे भाऊ अभिनेता अरबाज खान आणि अभिनेता सोहैल खान यांनी केला आहे.  

अरबाज खान आणि सोहैल खान यांनी 'टाइमआऊट विथ अंकित' या पॉडकास्टमध्ये बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अरबाज म्हणाला, 'सलमान आमच्यात मोठा आहे आणि लहानपणी तोच सर्वांत मस्तीखोर होता. तो सतत वडिलांचा ओरडा खायचा आणि कधी कधी त्याला मारसुद्धा खावा लागायचा. एकदा वडिलांनी सलमानला सर्कसमधील एक शो दाखवण्यासाठी नेलं होतं. तेथून परतल्यानंतर सलमान एका इमारतीजवळ जाऊन सर्कसमधील स्टंट करून पाहत होता. हे करताना तो काठीवरून पडला आणि त्याच्या हाताला मार लागला. आमच्याकडून सहानुभूती मिळेल, म्हणून तो तुटलेला हात घेऊन वडिलांसमोर आला. पण हे सर्व करायची काय गरज होती अस म्हणत त्यांनी  थेट सलमानच्या कानशिलात लगावली'.  

नुकतेच सलमान खान जामनगरमध्ये अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आमिर खानसोबत (Aamir Khan) डान्स करताना दिसला. लवकरच अभिनेत्याचा नवा चित्रपट 'द बुल' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. तर तो शेवटचा 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्याचा 'पठाण'मधील कॅमिओही तुफान गाजलेला.   

टॅग्स :सलमान खानअरबाज खानसोहेल खानसलीम खानबॉलिवूडसिनेमा