#Amul Topical: Anushka-Virat ..will they-won’t they? pic.twitter.com/928sFjkl3p— Amul.coop (@Amul_Coop) December 30, 2016
अमूलची नवी जाहिरात अनुष्का विराटच्या साखरपुड्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 18:35 IST
न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी उत्तराखंड येथे गेलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली हे नव्या वर्षाच्या मुहुर्तावर सारखपुडा ...
अमूलची नवी जाहिरात अनुष्का विराटच्या साखरपुड्यावर
न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी उत्तराखंड येथे गेलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली हे नव्या वर्षाच्या मुहुर्तावर सारखपुडा करणार आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. या सर्व चर्चांना विराम देताना अनुष्का शर्माने सोशल मीडियावर या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले होते. दोन दिवसापूर्वी अनुष्का-विराटच्या साखरपुड्याची बातमी एवढी व्हायरल झाली ही प्रसिद्ध फुड ब्रॅण्ड ‘अमूल’ने आपल्या जाहिरातीमध्ये स्थान दिले आहे. न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी देहरादून येथे पोहोचलेल्या अनुष्का शर्मा व विराट कोहली यांचा एका पार्कमधील मोराला दाणे घालतानचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोनंतर दोघेही साखरपुडा करणार अशा बातम्या आल्या होत्या. या कार्यक्रमाला बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, उद्योजक अनिल अंबानी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत हे उपस्थित राहणार आहेत अशा बातम्यांना उधाण आले होते. यातच अमिताभ व अनिल अंबानी देहरादून मध्ये पोहोचल्याने याला दुजोराच मिळाल होता. अखेर या अफवांना विराम देण्यासाठी अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियात आम्ही साखरपुडा करणार नाही अशी माहिती दिल्यावर या चर्चा थांबल्या. नेहमीच ट्रेंडिंग विषयावर भाष्य करीत आपली जाहिरात करणाºया अमूलने या अनुष्का शर्मा व विराट कोहलीच्या साखरपुड्याच्या बातमीचा आधार घेत नवी जाहिरात केली आहे. या जाहिरातीमध्ये अनुष्का व विराट यांच्यासारखे दोन कार्टून मोराला दाणे घालताना दिसत आहेत. या जाहिरातीत ‘इंडियाज मोस्ट एंगेजिंग कपल’ असा उल्लेख करण्यात आला आहे. खाली कॅप्टन्स आॅफ बॅटरीज असे लिहिले आहे. अमूल आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून ट्रेंडिंग विषयावर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी देखील ‘अमूल’च्या जाहिरातींवर चांगलीच चर्चा झाली आहे. }}}} ">http://