Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रभासमुळे अनुष्का शेट्टीचे लग्न होता होता राहिले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 16:05 IST

‘बाहुबली2’ने धमाकेदार यश मिळवले. हा चित्रपट रिलीज होऊन उणापुरा महिना होतोय. पण अद्याप चित्रपटाची झिंग उतरलेली नाही. याचमुळे या ...

‘बाहुबली2’ने धमाकेदार यश मिळवले. हा चित्रपट रिलीज होऊन उणापुरा महिना होतोय. पण अद्याप चित्रपटाची झिंग उतरलेली नाही. याचमुळे या चित्रपटाने आत्तापर्यंत १५०० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. हा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. कदाचित म्हणूनच चित्रपटासंदर्भात लहान-सहान गोष्टही आज बातमी ठरतेय. तर आज आम्ही अशीच एक बातमी घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहोत. अर्थात ही बातमी लहान-सहान नाही तर चांगलीच इंटरेस्टिंग आहे. बातमी आहे, चित्रपटाची लीड हिरोईन अनुष्का शेट्टी हिच्याबद्दल. ‘बाहुबली2’नंतर अनुष्का व प्रभास या दोघांच्या चाहत्यांची संख्या कैकपटींनी वाढली आहे. म्हणूनच या दोघांच्या अफेअरची बातमी येताच, चाहत्यांनाही ही बातमी खरी ठरावी, असे क्षणभर वाटले. पण प्रत्यक्षात अनुष्का व प्रभास या बातमीने काहीसे विचलित झालेत. पण आता यालाच जोडून एक खबर आहे. होय, प्रभासमुळे अनुष्काने दोन वर्षे लग्न केले नाही, ही ती बातमी.ALSO READ : ​ ‘साहो’मध्येही ‘देवसेना’! पुन्हा रंगणार प्रभास व अनुष्का शेट्टीचा रोमान्स!अनुष्का दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होती. पण प्रभासने तिला लग्न करण्यास मनाई केली. अनुष्काने ‘बाहुबली2’रिलीजनंतर लग्न करावे, असे प्रभासचे मत होते. कारण ‘बाहुबली’ सीरिजसाठी प्रभासने आपल्या आयुष्याची पाच वर्षे दिली होती. अशात अनुष्का लग्नाचा प्लान करतेय, असे त्याला कळले तेव्हा त्याने तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला. अनुष्काचे लक्ष ‘बाहुबली2’वरून जराही हटता कामा नये, असे प्रभासला वाटत होते. कारण या चित्रपटासाठी त्याने व अनुष्काने जीवतोड मेहनत केली होती. अखेर प्रभासचा सल्ला मानला आणि लग्न दोन वर्षे पुढे ढकलले. आता ‘बाहुबली2’ रिलीजनंतर अनुष्का कधी लग्न करते, ते बघूच!