अनुष्काने चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर रणवीर सिंग, शाहिद कपूर या अभिनेत्यांसोबत तिचे नाव जोडले गेले. पण अनुष्काने नेहमीच या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे पसंत केले.
अनुष्काने यश राज फिल्मसच्या रब ने बना दी जोडी या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटातील अनुष्काच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनुष्का मॉडलिंग करत असे. तिच्या या मॉडलिंगच्या काळात तिचे जोहेब युसूफ या मॉडेलसोबत अनेक वर्षं अफेअर होते. मॉडलिंग करत असताना अनुष्का आणि जोहेब यांची बंगळूरूमध्ये ओळख झाली होती. तिथूनच त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. चित्रपटसृष्टीत भाग्य आजमवण्यासाठी ते दोघे मुंबईत देखील एकत्र आले होते. पण अनुष्काला काहीच महिन्यात चित्रपटाची ऑफर मिळाली आणि त्यानंतर तिच्या आणि जोहेबच्या नात्यात दुरावा आला. अनुष्का जवळजवळ दोन वर्षं जोहेबसोबत नात्यात होती.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीमध्ये लग्न करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. ११ नोव्हेंबरला अनुष्का आणि विराट यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत २१ तारखेला विराटच्या कुटुंबियांसाठी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी होणार असून अनुष्का आणि विराटच्या बॉलिवूडमधील आणि क्रिकेट क्षेेत्रातील मित्र मैत्रिणींसाठी २६ तारखेला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. रिसेप्शन नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विराट आणि अनुष्का साऊथ आफ्रिकेला रवाना होणार आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात मुंबईतील वरळी येथील घरात ते गृहप्रवेश करणार आहेत.
Also Read : तुम्हाला माहीत आहे का विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लहानपणापासूनच ओळखतात एकमेकांना?