Join us

सर्जरीमुळे अनुष्का शर्माचा झाला कायापालट, पूर्वीचे फोटो पाहून थक्क !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 15:03 IST

अनेक अभिनेत्रींनी सर्जरी करत आपला मेकओव्हर केला आहे. याच यादीत अनुष्का शर्माचेही नाव गणले जाते.

मेकओव्हर केल्यानं कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण मेकओव्हर केल्यानंतर लगेचच कामाचा बडा प्रोजेक्ट हाती लागला तर सोने पे सुहागाच. अनेक अभिनेत्रींनी सर्जरी करत आपला मेकओव्हर केला आहे. याच यादीत अनुष्का शर्माचेही नाव गणले जाते. बॉलिवूडमध्ये आपली करिअरची गाडी सुस्साट पळावी यासाठी सर्जरीचा आधार घेतला. 

मेकओव्हरनंतर अनुष्काला बड्या बॅनर्सचे सिनेमा मिळाले. मात्र अनुष्काचे पूर्वीचे फोटो तुम्ही पाहिले तर तिच्यात झालेला हा कमालीच फरक तुम्हाला जाणवेल. 'रब ने बना दी जोडी' या सिनेमात तिचा लूक आणि नंतरच्या आलेल्या सिनेमातील लूक पाहिला तर तिच्या चेह-यात झालेला बदल लगेच कळतो. 

सर्जरी केल्यानंतर अनुष्काने पिके सिनेमात एंट्री केली. त्यावेळी तिच्या लूकमुळे तिच्यावर खूप टीकाही केली गेली. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून डोनाल्ड डक सारखी दिसत असल्याच्या कमेंटस तिच्या फोटोंवर केली जायची. त्यावेळी तिची सर्जरी फसल्याचेही बोलले गेले. मात्र हळुहळु अनुष्काचा बदलेला लुक रसिकांनी स्विकारला आणि आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत अनुष्काचे ना सामिल झाले आहे.

टॅग्स :अनुष्का शर्मा