Join us  

वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचं शतक, नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:22 AM

वर्ल्डकपमध्ये शतक झळकावल्यानंतर विराटचं सर्वत्र कौतुक होत आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास पोस्ट शेअर केली आहे.

सध्या सगळीकडेच वर्ल्डकपचा थरार पाहायला मिळत आहे. गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर भारत आणि बांगलादेशमध्ये थरारक सामना रंगला. या सामन्यात भारताने ७ गडी राखून भारतावर विजय मिळवला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक झळकावलं. नाबाद शतकी खेळी करणारा विराट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला. वर्ल्डकपमध्ये शतक झळकावल्यानंतर विराटचं सर्वत्र कौतुक होत आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास पोस्ट शेअर केली आहे. 

बांगलादेश विरुद्ध मॅचमध्ये शतकी खेळी केल्यानंतर विराटसाठी अनुष्काने खास पोस्ट शेअर केली आहे. इंडियन क्रिकेट टीमच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन  विराटसाठी केलेली पोस्ट अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये अनुष्काने हार्ट इमोजीही कॅप्शनमध्ये टाकले आहेत. अनुष्काने विराटचं कौतुक करत केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले २५७ धावांचे लक्ष्य भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करून पार केलं. विराट कोहलीने विजयी षटकार ठोकून वर्ल्डकपमधील शतकही पूर्ण केलं आणि मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४८ वे शतक ठरले आणि ८ वर्षानंतर त्याने प्रथमच वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावले. धावांचा पाठलाग करताना हे त्याचे वर्ल्ड कपमधील पहिले शतक ठरले. याचसोबत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २६ हजार धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. विराट ने ५७७ इनिंग्जमध्ये हा पल्ला पार करून सचिन तेंडुलकरचा ( ६०१ इनिंग्ज) वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.   

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माआयसीसी आंतरखंडीय चषक