Join us

विराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 15:28 IST

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. 2018 मध्ये आनंद एल राय यांच्या 'झिरो' सिनेमात दिसली होती.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. 2018 मध्ये आनंद एल राय यांच्या 'झिरो' सिनेमात दिसली होती त्यानंतर अनुष्काने एकही सिनेमा साईन केला नाही. याच दरम्यान सिनेमातून ब्रेक घेऊन पती विराट कोहलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसली. मात्र लवकरच अनुष्का कमबॅक करतेय.

आजतकच्या रिपोर्टनुसार अनुष्का शर्मा तिच्या प्रोडेक्शन अंतर्गत नवीन वेबसिरिज घेऊन येते आहे.  ही वेबसिरीज महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. जीच्या हातून एक कुविख्यात माफियाचा मृत्यू होतो. जसजशी वेळ पुढे निघून जाते तशी ती अंडरवर्ल्डच्या आणि राजनैतिक दुनियाच्या जाळ्यात फसत जाते. ही वेबसिरिज अतुल मोंगिया, तमाल सेन आणि अमित व्यास यांनी लिहिली आहे. भले ही या वेबसिरीजमध्ये अनुष्का अभिनय करताना दिसणार नाहीय. पण लवकरच ती स्क्रिनवर परतले अशी आशा तिचे फॅन्स करत आहेत.      

गेल्या काही दिवसांपूर्वी अनुष्काचे क्रिकेट वर्ल्ड कपच्या दरम्यान पतीसोबत लंडनमधले फोटो चर्चेत आले होते. दोघे लंडनच्या रस्त्यांवर फिरताना स्पॉट झाले होते.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबाबत बोलताना अनुष्का म्हणाली होती, मला वाटले 30 वर्षांच्या आत लग्न केले पाहिजे. प्रेक्षक आपल्या इंडस्ट्रीपेक्षा जास्त समजूतदार आहेत. त्यांना फक्त कलाकारांना टिव्हीवर बघायचे असते. त्याना तुमचं लग्न झालेले आहे नाही किंवा तुम्ही आई आहेत याच्याशी काही घेणदेण नसतं. आपल्याला या मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे. मी 29 व्या वर्षी लग्न केले कारण मी प्रेमात होते आणि अजूनही आहे. मी नेहमीच स्त्रींच्या सन्मान करते आणि  मी खूश आहे की इंडस्ट्रीतील बऱ्याच अभिनेत्रींनी लग्न केले आहे.    

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली