Join us

कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 09:38 IST

गाडीतून उतरताना विराटने दिला हात, अनुष्का रागातच पुढे निघून गेली

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेट नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅन पेजवरील एक पोस्ट लाईक केली. अवनीतचे बोल्ड फोटो असलेली ती पोस्ट होती. विराटच्या लाईकने सोशल मीडियावर काही मिनिटात चर्चा सुरु झाली होती. अनुष्कावर मीम्सही बनले शेवटी विराटलाही यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. इन्स्टाग्रामवरील अल्गोरिदममुळे ते झाल्याचं तो म्हणाला. आता या चर्चांदरम्यान विराट अनुष्काचा (Anushka Sharma) व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनुष्का विराटवर नाराज असल्याचं दिसत आहे.

विराट कोहली सध्या आयपीएलमुळे भारतात आहे. त्याच्यासोबत अनुष्काही इथेच आहे. दोघंही काल रात्री बंगळुरुमधील एमजी रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. गाडीतून उतरताच विराटने अनुष्काला हात दिला. मात्र अनुष्का त्याचा हात न धरताच उतरली आणि पुढे गेली. ती थोडी नाराज असल्याचंही दिसत होतं. अनुष्का पुढे जाताच विराटही तिच्या मागे गेला. दोघांनी कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि ते रेस्टॉरंटमध्ये गेले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

विराटच्या चाहत्यांनी व्हिडिओ डिलिट करा अशा कमेंट्स केल्या. तर काहींनी अनुष्काला ट्रोल केलं. अवनीतच्या चर्चांमुळेच अनुष्का नाराज असल्याचं दिसतंय अशी कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.  विराट आणि अनुष्का पॉवरफुल कपल आहेत. मात्र ट्रोलिंगमुळे त्यांनाही त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेकदा दोघांनी या ट्रोलिंगला त्यांच्या सोशल मीडियावर उत्तरं दिली आहेत. अवनीतच्या चर्चांवरही विराटने स्पष्टीकरण दिलं. मात्र यामुळे तो फारच निराश झाल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. सीएसकेविरुद्ध बंगळुरुने सामना जिंकल्यानंतरही विराटने सेलिब्रेशन केलं नाही याचं कारण या चर्चाच आहेत असंही म्हटलं गेलं होतं. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माबेंगळूरट्रोलसोशल मीडिया