Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेटवर अनुष्का-ऐश्वर्याची घट्ट मैत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 12:39 IST

 जर तुम्हाला वाटत असेल ती ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यात शीतयुद्ध आहे तर तुम्ही त्या दोघींना चुकीचे ...

 जर तुम्हाला वाटत असेल ती ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यात शीतयुद्ध आहे तर तुम्ही त्या दोघींना चुकीचे समजत आहात. खोट वाटत असेल तर ‘ऐ दिल हैं मुश्किल’ च्या सेटवर जाऊन पहा.त्या दोघी एकमेकींशी बोलण्यासाठी शॉट केव्हा संपतो? याची वाट पाहत होत्या. त्यांचा एकही शॉट एकत्र नसल्याने प्रत्येक वेळी कोणी ना कोणी तरी बिझी हे होतेच. चित्रपटातील बरेच शॉट्स हे लंडनमध्ये शूट करण्यात आले आहेत. आता  या दोघींकडे पाहून असे वाटतेय की, या दोघींना एकमेकांबद्दल काही मुश्किल नाहीये.या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत आहे. त्यातील रोमँटिक सीन्स, जोड्या, यांच्यामुळे चित्रपट भयंकर चर्चेत आहे. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहण्यासारखे आहे.