Join us

अनुराग कश्यपकडे लेकीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, दाक्षिणात्य अभिनेता मदतीला आला धावून, कोण आहे 'तो'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:04 IST

अनुराग कश्यप संकटात असताना 'तो' सुपरस्टार बनला देवदूत

Anurag Kashyap: हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दमदार, परखड आणि प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप ओळखला जातो. अनुराग कश्यप याने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्यातील एक भावनिक अनुभव शेअर केला आहे. अलिकडेच अनुरागच्या लेकीचं लग्न झालं. पण लग्नाच्या वेळेस तो आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण परिस्थितीत होता. इतका की, लग्नासाठी आवश्यक असलेली रक्कमही त्याच्याकडे नव्हती. या कठीण काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार  अनुरागच्या मदतीला धावून आला होता. तो अभिनेता होता विजय सेतुपती (Vijay Sethupathi). नुकतंच 'द हिंदू'च्या 'द हडल' शोमध्ये अनुरागने हा किस्सा सांगिला.

अनुराग कश्यपनं 'द हिंदू' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, राहुल भट्ट आणि सनी लियोनी यांच्या 'केनेडी' या चित्रपटाच्या पोस्ट-प्रोडक्शन कामात तो  व्यस्त होता, त्याच दरम्यान त्याची भेट विजय सेतुपतीशी झाली. अनुराग म्हणाला,  'इमाइका नोडिगल' (Imaikkaa Nodigal) नंतर मी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना नकार दिला होता. दर दोन दिवसानंतर मला ऑफर येत होत्या. मग एकदिवशी केनेडीच्या पोस्ट-प्रोडक्शन दरम्यान, विजय सेतुपतीला भेटलो. त्यांनं मला सांगितलं की त्याच्याकडे खूप चांगली स्क्रिप्ट आहे, ज्यात मी असावं अशी त्याची इच्छा आहे. पण सुरुवातीला मी नकार दिला".

लेक आलियाच्या लग्नाचा विषय निघाला, आणि..."पण त्यानंतर मी विजयला सहज सांगितलं की, माझ्या मुलीचं लग्न पुढच्या वर्षी आहे आणि मला वाटतं मी खर्च झेपवू शकणार नाही. हे ऐकून विजय म्हणाला, 'मी आहे ना, मी तुझी मदत करतो' आणि मला विजयच्या 'महाराजा' या आगामी चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली". अनुरागची लेक आलिया कश्यप ही डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईत लग्न बंधनात अडकली. आलियानं तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरेसोबत लग्न केलं होतं. 

दरम्यान. विजय सेतुपती फक्त दमदार अभिनेता नाही, तर एक हळव्या मनाचा माणूसही आहे, हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं. विजय सेतुपतीच्या 'महाराजा' या तमिळ हिट चित्रपटामुळे अनुराग कश्यपची केवळ अभिनयातील नवी वाटचाल सुरु झाली नाही, तर व्यक्तिगत आयुष्यातही मोठी मदत झाली. नितिलन स्वामीनाथन दिग्दर्शित ‘महाराजा’ हा चित्रपट जून 2024 मध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाने जगभरात १९० कोटी रुपयांची कमाई केली आणि २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या तमिळ चित्रपटांपैकी एक ठरला. 

टॅग्स :अनुराग कश्यपलग्न