Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुपम धोनीच्या वडिलांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:41 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते अनुमप खेर हे धोनीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते अनुमप खेर हे धोनीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'वेन्स्डे' या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक निरज पांडे हे महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट बनवित आहेत.या चित्रपटात सुशांत राजपूत हा महेद्रसिंह धोनीचे पात्र साकारणार आहे.आयआयटी खरगपूर येथे एका कार्यक्रमात अनुपम खेर आले होते. या वेळी चाहत्यांशी त्यांनी संवाद साधला. चित्रपटातील पात्राविषयी त्यांना विचारले असता धोनीचे वडील पानसिंग यांची भूमिका या चित्रपटात साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.