प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; तिचे सौंदर्य बघून व्हाल फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 19:27 IST
इंटरनेट सनसनी प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; तिचे सौंदर्य बघून व्हाल फिदा!
आपल्या अदांनी इंटरनेटवर सनसनी निर्माण करणाºया प्रिया प्रकाश वारियरचा कुठलाही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला की, तो वाºयासारखा व्हायरल होतो. अशात प्रियाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, तोदेखील सर्वत्र व्हायरल होत आहे. यावेळेस ती व्हिडीओमध्ये अभिनय करीत नसून, एका इव्हेण्टमध्ये सहभागी होण्यासाठी जाताना दिसत आहे. काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली प्रिया व्हिडीओमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये प्रिया तिच्या आगामी ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडीओ शूट करण्यासाठी जाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा को-अॅक्टर रोशन अब्दुल रहूफ हादेखील दिसत आहे. प्रियाला तिच्या डोळ्यांच्या अंदाजासाठी ओळखले जाते. ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन उमर लुलू यांनी केले आहे. तर यास शान रहमान यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असून, तोपर्यंत प्रिया प्रकाशचे असेच जलवे चाहत्यांना बघावयास मिळणार आहेत. दरम्यान, या चित्रपटातील एका गाण्यामुळे प्रिया प्रकाशला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. याबाबतचा अंदाज तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून लक्षात येतो. इन्स्टावर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या ६० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तिच्याबद्दल हेदेखील म्हटले जाते की, एका प्रमोशनल पोस्टसाठी ती आठ लाख रूपयांपर्यंत चार्ज करते. दरम्यान प्रिया प्रकाशचा जन्म केरळ येथील त्रिशूर येथे झाला आहे. ती त्रिशूर येथील विमला कॉलेजची ती बीकॉमच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. ‘ओरू अदार लव’मध्येही प्रियाने विद्यार्थिनीचीच भूमिका साकारली आहे. ‘ओरू अदार लव’मधील ‘मनिक्य मलाराया पूवी’ या गाण्यामुळे तिला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. या गाण्यातील केवळ २८ सेकंदांच्या व्हिडीओमुळे ती आज इंटरनेट सनसनी बनली आहे.