Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीसोबत लग्न करणाऱ्या अनुष्काला मिळाली दुसरी गुड न्यूज; बनली ‘पेटा पर्सन आॅफ द ईयर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:54 IST

काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी विवाहाच्या बंधनात अडकलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला पुन्हा एकदा गुड ...

काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी विवाहाच्या बंधनात अडकलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला पुन्हा एकदा गुड न्यूज मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच फोर्ब्सने ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १००’ची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनुष्काला दुसरे स्थान देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अनुष्काला असाच काहीसा सन्मान मिळाला आहे. होय, अनुष्काला ‘पेटा पर्सन आॅफ द ईयर’ या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. ‘पीके’, ‘जब तक है जान’, ‘ऐ दिल है मुश्किल’ यासारख्या सुपरहिंट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणारी अनुष्का शुद्ध शाकाहारी आहे. अनुष्काला हा पुरस्कार कुत्र्यांना आतसबाजीपासून वाचविण्यास मदत करण्याच्या कार्याकरिता देण्यात आला आहे. वास्तविक प्राण्यांप्रती अनुष्काच्या दयाळू वृत्तीला ‘पीपुल फॉर द एथिकल ट्रीटमेंट आॅफ अ‍ॅनिमल्स’ पेटाने ओळख दिली आहे. ALSO READ : विराट कोहलीसोबत लग्न करताच अनुष्का शर्माला मिळाली गुड न्यूज!पेटाचे सचिन बांगेला (सेलिब्रिटी पब्लिक रिलेशन्स असोसिएट डायरेक्टर) यांनी एका वक्तव्यात म्हटले की, ‘पेटा सर्वांनाच शाकाहारी आणि हेल्दी आहार घेण्याचा सल्ला देत असते. कारण हे खूपच महत्त्वाचे आहे की, तुम्ही कोणता आहार करता. सदृढ आरोग्यासाठी अधिकाधिक हिरवा भाजीपाला खायला हवा.’ पुढे बोलताना बांगेराने म्हटले की, अनुष्का नेहमीच शाकाहारी आहार घेत असून, इतरांना शाकाहारासाठी प्रवृत्त करीत आली आहे. दरम्यान अनुष्काला याअगोदर २०१५ साली ‘पीपुल फॉर एथिकल ट्रीटमेंट आॅफ अ‍ॅनिमल्स’ (पेटा)ने हॉटेस्ट व्हेजिटेरियन आॅफ २०१५ या किताबाने सन्मानित केले आहे. दरम्यान, विराटशी लग्न केल्यानंतर अनुष्काला सातत्याने गुड न्यूज मिळत आहे. कालच अनुष्का अन् विराटच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबईत पार पडले. या रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूड, क्रिकेट तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. ११ डिसेंबर रोजी इटलीत लग्न करणाºया या दाम्पत्याने त्याच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन दिल्लीत दिले होते.