Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतसाठी खूप पझेसिव्ह होती अंकिता लोखंडे,या घटना आहेत त्याचा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 14:56 IST

अंकिताचेही सुशांतवर जीवापाड प्रेम होते. 'पवित्र- रिश्ता' या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते.

त्यामुळंच की काय प्रत्येक व्यक्तीसाठी करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा असतो. असेचकाही सुशांतसाठी त्याचे स्ट्रगलच दिवस खूप खास होते. तेव्हा त्याला ख-या अर्थाने साथ दिली होती अभिनेत्री अंकिता लोखंडेने. 

अंकिताचेही सुशांतवर जीवापाड प्रेम होते. 'पवित्र- रिश्ता' या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते. नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशांत-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाले तेव्हा बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या.नुकतेच काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिची एका बिझमनसोबत एंगेजमेन्ट झाली आहे. 

सुशांतच्या जाण्याचा अंकिताला जबरदस्त धक्का बसला आहे. अंकिता सुशांतची फक्त गर्लफ्रेंड नव्हती ती त्याची आईप्रमाणे काळजी घ्यायची.

 

सुशांतच्या आवडीचे जेवण करायची. अंकिताच्या घरचे इंटिरिअरदेखील सुशांतच्या आवडीचे होते.

अंकिता सुशांतला घेऊन खूप इमोशनल होती. सुशांतचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सुशांतसाठी जवळपास तिने अभिनय सोडला होता. 

टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा असल्याने तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. ब्रेकअपनंतरही सुशांतचा कोणताही सिनेमा शुक्रवारी रिलीज होताच अंकिता देवाकडे त्याच्या यशासाठी प्रार्थना करायची.

सुशांतचे वडिल के. के. सिंग एका मुलखती दरम्यान म्हणाले, सुशांतमुळेच ते अंकिता लोखंडेला भेटले होते. सुशांतच्या निधनानंतर अंकिता फक्त मुंबईतच त्याना भेटायला आली नव्हती तर ती पाटण्याला सुद्धा येऊन त्यांना भेटून गेली होती.

रिपोर्टनुसार अंकिता लोखंडे सुशांतच्या आयुष्यातली एकच अशी मुलगी होती जी त्याच्या वडिलांना माहित होती. इतकेच नव्हेतर अंकिता सुशांतसोबत रिलेशनशीपमध्ये होती तेव्हा तिने आपलं घरं सुशांतसोबतच्या फोटोंनी सजवले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे