Join us

अंकिता लोखंडेने शेअर केला तिचा लेटेस्ट फोटो, फॅन्ससाठी लिहिला स्पेशल मेसेज

By गीतांजली | Updated: October 28, 2020 15:49 IST

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते असते. अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. अंकिताने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांसाठी स्पेशल मेसेज लिहिला आहे. 

अंकिता ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. 'जर सर्व काही परफेक्ट असेल तर आपण कधीही शिकणार नाही,  ना कधीही पुढे जाऊ शकलो असतो.' असे कॅप्शन अंकिताने या फोटोला दिले आहे. जे तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहे. एका यूजरने लिहिले, कॅप्शनसाठी धन्यवाद, यामुळे मला प्रेरणा मिळाली. याशिवाय अंकिताचा हा फोटोदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

अंकिताच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर गेल्या वर्षी रिलीज झालेल्या कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती 'बागी 3'मध्ये दिसली होती.

या सिनेमात अंकिता रितेश देशमुखच्या अपोझिट दिसली होती. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची यात मुख्य भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली होती. अंकिताने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली होती. एकता कपूरच्या 'पवित्रा रिश्ता' मालिकेत अर्चनाच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती.  

टॅग्स :अंकिता लोखंडे