Join us

अंकिता लोखंडेच्या सेक्सी अदा पाहून चाहते झाले क्रेझी, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 18:42 IST

अंकिता नव्या फोटोशूटमुळे असते चर्चेत

अभिनेत्री अंकिता लोखंडे विकी जैन सोबत असलेल्या अफेयरमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. त्यानंतर सध्या ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने न्यूयॉन रंगाच्या आऊटफिटसोबत मेकअपमध्ये फोटोशूट केले होते. त्यानंतर आता तिने आणखीन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती ग्लॅमरस दिसते आहे.

‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही. चर्चेत कसे राहायचे हे अंकिताला चांगलेच कळतेय. सोशल मीडियावर स्वत:चे नवे फोटो शेअर करून ती सतत चर्चेत असते. काही तासांपूर्वी अंकिताने असेच स्वत:चे काही नवे फोटो पोस्ट केलेत. या फोटोत अंकिता ग्लॅमरस अंदाजात दिसतेय.

लवकरच अंकिता टीव्हीवर पुनरामगन करणार असल्याचे मानले जात आहे. होय, ‘नागीन 4’ या मालिकेसाठी एकता कपूरने अंकिताची निवड केल्याची चर्चा आहे. निया शर्माचे नाव आधीच या मालिकेसाठी फायनल झाले आहे. तर दुस-या ‘नागिन’साठी अंकिताला साईन करण्यात आले आहे. अर्थात अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.

यापूर्वी अंकिताने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलेय. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेने अंकिताला एक वेगळी ओळख दिली होती. या मालिकेनंतर एकता व अंकिताने कुठल्याच मालिकेत एकत्र काम केले नाही.

अलीकडे कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात अंकिताने झलकारीबाईची भूमिका साकारली होती.

टॅग्स :अंकिता लोखंडे