Join us

VIDEO : अंकिता लोखंडेने पोस्ट केला सुशांतसोबतचा एन्जॉय करतानाचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 11:33 IST

आता अंकिताने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात ती सुशांतसोबत व्हेकेशनवर आहे. या व्हिडीओसोबत एक कविताही आहे. 

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे सुरूवातीपासून त्याच्या परिवारासोबत उभी आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता साधारण ४० दिवसांपर्यंत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव दिसली. त्यानंतर तिने टीव्हीवर मुलाखतही दिली. सोबतच सुशांतसंबंधी वेगवेगळ्या गोष्टी आणि आठवणी शेअर करत आहे. आता अंकिताने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात ती सुशांतसोबत व्हेकेशनवर आहे. या व्हिडीओसोबत एक कविताही आहे. 

काश तूने ये उड़ान न भरी होती...

अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओसोबत कविता आहे. काश तूने ये उड़ान भरी ही ना होती यार मेरे ,या फ़िर काश तू जुड़ा रहता उन सब से जो तुझे तेरी जड़ों से जोड़े रखते थे। यूं तो शायद इतना तुझे याद ना करते हम यार , क्यूंकि तू मशरूफ था, खुश दिखता था खुद की चुनी हुई नयी दिलचस्प गलियों में, हम भी तेरे यार खुश थे। तुझे ऊंचा उड़ता देखकर. इस तरह तुझे खो देने का इल्म होता अगर, तो तुझे ये उड़ान भरने ही ना देते हम यार, क्यूंकि जब तू यहां ज़मीन पर था हम यारों के साथ, हसते थे हम, गाते भी थे, किस्से एक -दूसरे को सुनाते भी थे। क्या हुआ जो ये हसत हुआ सपनों को यूं जीता हुआ यार मेरा फिर कभी ना हंसेगा, ना रोयेगा फिर कभी ना जिएगा बस सोयेगा। उसकी इस नींद को सुकून दे या रब।

सुशांतने केली पॅराग्लायडिंग

या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे जोरात ओरडताना ऐकायला मिळते. ती गुग्गू म्हणत जोरात ओरडताना ऐकायला येते. सुशांतचं नाव गुलशन होतं आणि अंकिता त्याला प्रेमाने गुग्गू म्हणत होती.

सुशांतसंबंधी आठवणी शेअर करते अंकिता

अंकिताने याआधीही सुशांतसंबंधी अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुशांत क्लास्ट्रोफोबिक होता आणि फ्लाइटमध्ये घाबरत होता. तेव्हा अंकिताने सुशांतचा फ्लाइट सिम्युलेटरसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला.

दरम्यान, अंकिता लोखंडे सुशांतसाठी न्यायाची सतत मागणी केली होती आणि सुशांतच्या परिवारासोबत उभी होती. अंकिता आणि सुशांतने पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघेही ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर ब्रेकअप झालं होतं.

हे पण वाचा:

ब्रेकअपनंतर एकमेकांशी कधीच बोलले नव्हते सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडेने दाखवला ‘पॉवर ऑफ वुमन’, रिया चक्रवर्तीच्या ‘विधवा’ कमेंटवर असे दिले प्रत्युत्तर

'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत