Join us

अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत एन्जॉय करतेय तिचा क्वॉलिटी टाइम, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 17:06 IST

सध्या अंकिता तिचा क्वॉलिटी टाईम बॉयफ्रेंड विकी जैनसोबत एन्जॉय करताना दिसते आहे.

'बागी ३' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्सही मिळाला. मणिकर्णिकामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेनेबागी ३ चित्रपटात काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिकेचंही खूप कौतूक झालं. सध्या अंकिता तिचा क्वॉलिटी टाईम बॉयफ्रेंड विकी जैनसोबत एन्जॉय करताना दिसते आहे. 

अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर विकी जैनसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्या दोघांची जोडी खूप कमाल दिसते आहे. 

अंकिता व विकी लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र अंकिताने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत तिने सध्यातरी लग्न करण्याचा काही प्लान नसल्याचे सांगितले होते. 

विकी व अंकिता नुकतेच मुंबईत होळी सेलिब्रेट करताना दिसले होते. अंकिता व विकीचे होळीचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते.

अंकिता लोखंडे हिने छोट्या पडद्यावरून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तिने पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनय क्षेत्रात तिने एन्ट्री केली. या मालिकेतून ती खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तिने कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट मणिकर्णिका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अंकिताने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. या भूमिकेचं सगळीकडून खूप कौतूक झाले होते. 

'बागी ३' चित्रपटानंतर ती चेहरे या चित्रपटातही दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेबागी ३माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी