Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडे पुन्हा एकदा आली चर्चेत, तिचा बाथटब व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 19:22 IST

अंकिता लोखंडेने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची चर्चा होताना दिसते आहे.

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. अंकिताने पवित्रा रिश्ता मालिकेतून घराघरात ओळख निर्माण केली आहे. अभिनयाशिवाय अंकिता सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. यादरम्यान अंकिताने एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिचा हॉट अंदाज पहायला मिळतो आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अंकिता लोखंडेने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अंकिता बाथटबमध्ये बसून बोल्ड लूकमध्ये दिसते आहे. या व्हिडीओत ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे. यादरम्यान तिने मल्टीकलर शर्ट परिधान केला आहे. यावेळी तिने कर्ली हेअरस्टाईल केली होती. या व्हिडीओत अंकिता खूप हॉट दिसते आहे. या व्हिडीओत बॅकग्राउंडला मुस्कुराना भी तुझी से सीखा है हे गाणे ऐकू येत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

याशिवाय अंकिताने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती व्हाइट गाउनमध्ये दिसते आहे. या फोटोंनादेखील चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

 अंकिता लोखंडेने कंगना राणौतचा चित्रपट मणिकर्णिकामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिने झलकारी बाईची भूमिका केली होती. त्यानंतर ती बागी ३ चित्रपटात झळकली होती.

टॅग्स :अंकिता लोखंडेमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी