आदित्य धरचा 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. सेलिब्रिटींनाही या सिनेमाची भुरळ पडली आहे. स्पिरिट सिनेमाच्या शूटिंगमधून वेळ काढून दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी 'धुरंधर २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांनी एक्सवर ट्वीट केलं आहे. सिनेमाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे.
संदीप रेड्डी वांगा ट्वीटमध्ये म्हणतात, "कितीतरी लेखक आणि अभिनेत्यांनी प्रपोगंडा सिनेमावर करिअर बनवली आहेत. तेव्हा इंडस्ट्रीतले लोक गप्प होते. तेच लोक आता 'धुरंधर २'ची खिल्ली उडवत आहेत. तुमची उपहास करण्याची वृत्ती असेल , तर तुम्हाला स्वतःला उदारमतवादी म्हणवण्याचा अधिकार नाही. सत्य गोष्टींना प्रपोगंडा कधीपासून म्हणू जाऊ लागलं, माहीत नाही. आदित्य धर आणि रणवीर सिंग...ही काळी नजर अशी जाणार नाही. मुठभर लाल मिरचीने काम होणार नाही...पूर्ण शेतच जाळावं लागेल. धुरंधर २ काल पाहिला...अप्रतिम सिनेमा...".
'धुरंधर २' १९ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात रणवीर सिंह, आर माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, अर्जुन रामपाल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहे. आदित्य धरचं दिग्दर्शन असलेल्या 'धुरंधर २'ची क्रेझ संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे.
Web Summary : Sandeep Reddy Vanga lauded 'Dhurandhar 2,' criticizing those who built careers on propaganda yet mock the film. He defended the movie against 'propaganda' claims, praising Aditya Dhar and Ranveer Singh's work as exceptional, urging stronger action against detractors.
Web Summary : संदीप रेड्डी वांगा ने 'धुरंधर 2' की सराहना की और उन लोगों की आलोचना की जिन्होंने दुष्प्रचार पर करियर बनाया और अब फिल्म का मजाक उड़ा रहे हैं। उन्होंने 'दुष्प्रचार' के आरोपों के खिलाफ फिल्म का बचाव किया और आदित्य धर और रणवीर सिंह के काम को असाधारण बताया।