Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरने केला घात! शेवटच्या दिवसांत 'अशी' झालेली इरफान खानची अवस्था; 'अंग्रेजी मीडियम'च्या कॉस्ट्यूम डिझायनरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:20 IST

"खूप वेदना, शरीर साथ देत नव्हतं...", इरफान खानबद्दल 'अंग्रेजी मीडियम'च्या कॉस्ट्यूम डिझायनरचा खुलासा

Irrfan Khan: अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) हे हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा हा अभिनेता आपल्यात नाही. इरफान खानचं २९ एप्रिल, २०२० ला निधन झालं. या अभिनेत्याने आपल्या सिने-कारकिर्दीत‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. इरफान खानच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत.'अंग्रेजी मीडियम' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.  याचदरम्यान, अभिनेत्याची प्रकृती फारच ढासळली होती. 

अलिकडेच 'अंग्रेजी मीडियम' च्या कॉस्ट्यूम डिझायनर स्मृती चौहान यांनी डिजिटल कॉमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी कॉस्ट्यूम डिझायनर स्मृती चौहान यांनी म्हटलं की, "इरफान कर्करोगाने ग्रासले होते, तरीही शूटिंगदरम्यान ते खूप वेदना सहन करत राहिले."अभिनेता इरफान खानला मार्च  २०१८ मध्ये अभिनेत्याला ब्रेन कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर उपचारासाठी तो पदेरशात गेला होता.मात्र, अभिनेत्याची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. या मुलाखतीत इरफानच्या आठवणी शेअर करत त्या म्हणाल्या, "इरफान साहेबांची तब्येत सतत बिघडत होती.वेदना इतक्या होत्या की चेहरा पांढरा पडायचा, पण ते कधीच तक्रार करत नव्हते. ते मला फक्त एकच गोष्ट म्हणत होते,स्मृती, मला खूप थंडी वाजत आहे. त्यानंतर मग त्यांनी मला लंडनच्या एका ब्रँडबद्दल सांगितले आणि म्हणाले,कृपया तिथून माझ्यासाठी काही गरम कपडे आण."

त्यांचं शरीर साथ देत नव्हतं...

मग त्या म्हणाल्या,"चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे वजन सतत कमी होत होते. त्या काळात आम्हाला त्याच्या कपड्यांमध्ये खूप पॅडिंग घालावे लागले.चित्रपटात, आम्ही उन्हात शूट करावे लागतील अशा सीन्ससाठी त्यांना एक जॅकेट दिले होते आणि त्यात पॅडिंगही होते.ते आजारी होते. त्यांचे कुटुंब बऱ्याचदा वेळ त्यांच्यासोबत असायचे आणि कधीकधी, शूटिंग अनेकदा थांबत असे कारण त्यांचं शरीर साथ देत नव्हतं.'अंग्रेजी मीडियम'च्या वेळी असे अनेक दिवस होते, जेव्हा आम्ही शूटिंग करू शकलो नाही, कारण आमच्या सर्व प्रयत्नांनंतरही ते सेटवर येऊ शकले नाहीत.मात्र, अशा परिस्थितीतही काम करताना इरफान यांची मेहनत पाहून संपूर्ण युनिट भावूक होत असे."असा खुलासा त्यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Irrfan Khan's final days: Costume designer reveals actor's pain.

Web Summary : Costume designer Smriti Chauhan revealed Irrfan Khan bravely endured immense pain during 'Angrezi Medium' filming despite his cancer diagnosis. His health deteriorated, requiring padded costumes due to weight loss. He persevered despite physical struggles, deeply moving the entire unit with his dedication.
टॅग्स :इरफान खानबॉलिवूडसेलिब्रिटी