आम्ही या प्रश्नांचा पाठलाग केला, तेव्हा आम्हाला एक रोचक माहिती मिळाली. होय,‘टायगर जिंदा है’च्या ट्रेलरमध्ये जाणीवपूर्वक अख्खी कथा सांगितली गेली. हा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेण्यात आला. सूत्रांचे मानाल तर याचे कनेक्शन सलमानच्या यापूर्वीच्या ‘ट्यूबलाईट’ या सिनेमाशीही आहे. ‘ट्यूबलाईट’चा ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर तो अतिशय सुंदर होता. सलमानच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात काही अडचणी येणार आणि सलमानला त्या अडचणींचा सामना करावा लागणार, अशी हिंट या ट्रेलरमध्ये दिली गेली होती. पण चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांना सगळेचं वेगळे दिसले. आता ‘ट्यूबलाईट’ची बॉक्सआॅफिसवर काय गत झाली, ते तर तुम्हाला ठाऊक आहेच. त्यामुळेच सलमानने ‘टायगर जिंदा है’ च्या ट्रेलरमध्ये सगळे काही स्पष्ट स्पष्ट दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच कुठल्याही हिंट वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता चित्रपटात काय काय दिसणार, हे ट्रेलरमधूनच सांगण्यात आले.
ALSO READ: 'टायगर जिंदा है' मध्ये सलमान खानने कॅटरिना कैफला किस करण्यासाठी दिला नकार
तसे तुम्हाला माहित नसेल पण या चित्रपटासाठी दोन ट्रेलर बनवण्यात आले होते. पहिला ट्रेलर सलमान व कॅटरिना कैफच्या रोमान्सने भरलेला होता. तर दुसरा जबरदस्त अॅक्शनने. पण ऐनवेळी पहिला ट्रेलर रद्द करून दुसरा ट्रेलर रिलीज करण्याचा निर्णय घेतला गेला आणि ‘टायगर जिंदा है’ च्या या ट्रेलरला मिळत असलेला रिस्पॉन्स पाहता,हा निर्णय अगदी योग्यचं ठरला.