क्लायमॅक्स शूटदरम्यान गौतम आणि अभिनवने जरीनसोबत प्रॅँक खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोघांनी जरीनला प्रचंड घाबरविले. त्याचे झाले असे की, जरीन तिच्या व्हॅनमध्ये बसून, तिचे डायलॉग वाचत होती. तेव्हा अभिनव तिच्याकडे पळत आला अन् तिला गौतमचा अपघात झाल्याचे सांगितले. अपघातात तो गंभीर जखमी झाल्याचेही जरीनला सांगण्यात आले. हे एकताच जरीनला धक्का बसला, ती तिच्या व्हॅनमधून पळतच गौतमला बघण्यासाठी निघाली. गौतम जमिनीवर पडलेला होता. त्याच्या चेहºयावर रक्तासारखा लाल रंग दिसत होता. गौतमला या अवस्थेत बघून जरीन खूप जोरात ओरडली. तिला चक्कर येतात की काय अशी तिची अवस्था झाली होती. जरीनची ही अवस्था बघून गौतम हसत-हसत उठला.
मात्र यासर्व प्रकारामुळे जरीन खानला मिनी हार्ट अटॅक आला. त्यामुळे ती दोघांवर अशी काही संतापली की, दोघेही तिची माफी मागू लागले. त्यानंतर तिघेही हसायला लागले. ‘अक्सर-२’ला अनंत नारायण महादेवन यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट उद्या रिलीज होणार असून, यामध्ये माजी क्रिकेटपटू श्रीसंतही बघावयास मिळणार आहे.