Join us

सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्याच्या मुलीला डेट करतोय कार्तिक आर्यन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 15:38 IST

वर्षाच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये नव्या जोड्यांचे सूत जमायला सुरुवात झाली आहे. रिपोर्टनुसार चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे कार्तिक आर्यनला डेट करत असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देकार्तिकला सध्या बी-टाऊनमधील चॉकलेट बॉय आहे 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमातून कार्तिक प्रकाश झोतात आला

वर्षाच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये नव्या जोड्यांचे सूत जमायला सुरुवात झाली आहे. रिपोर्टनुसार चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेकार्तिक आर्यनला डेट करत असल्याची चर्चा आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात दोघांना अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहण्यात आले आहे. 

कार्तिकला सध्या बी-टाऊनमधील चॉकलेट बॉय आहे. सारा अली खानने देखील कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमातून कार्तिक प्रकाश झोतात आला. तर अनन्या पांडेसुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. अनन्या पांडे ‘स्टुडंट ऑफ द ईयर2’मधून बॉलिवूमध्ये डेब्यू करण्यास सज्ज आहे. यात तिच्यासोबत टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या ग्लॅमरस लूकमुळे अनन्या नेहमीच चर्चेत असते.   

‘स्टुडंट ऑफ द ईयर2’ नंतर आलिया कार्तिक सोबत पति पत्नी और वो च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाची अजून ऑफिशल घोषणा झालेली नाही. तसेच कार्तिक ‘लव आजकल’च्या सीक्वलमध्ये सुद्धा दिसणार आहे. कार्तिकच्या अपोझिट साराचे नाव निश्चित करण्यात आले आहे, असे इम्तियाजने सांगितले. काही दिवसांपूर्वीच कार्तिकला करण जोहरच्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनअनन्या पांडेसारा अली खान