Join us  

OMG!! लग्नाआधीच ब्रेकअप? एमी जॅक्सनने डिलीट केले भावी नवऱ्याचे सर्व फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:24 AM

बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक एमी जॅक्शन सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. एमीचे तिचा भावी नवरा जॉर्ज पानायिटूसोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या रंगलीये.

ठळक मुद्देएकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते.

बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक एमी जॅक्शन  (Amy Jackson) सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. एमीचे तिचा भावी नवरा जॉर्ज पानायिटूसोबत (George Panayiotou)  ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या रंगलीये. ही चर्चा सुरू झाली ती एमीच्या इन्स्टा अकाऊंटमुळे. होय, एमीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरचे जॉर्जसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. साहजिकच यानंतर एमी व जॉर्जचे ब्रेकअप झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अद्याप एमी वा जॉर्ज या दोघांपैकी कोणीही याबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही.

एमी व जॉर्ज 2015 पासून रिलेशनशिपमध्ये होते. 2019 मध्ये जॉर्जने एमीला जाम्बियामध्ये प्रपोज केले होते. यानंतर तीन महिन्यांनी आपण जॉर्जच्या मुलाची आई होणार असल्याची घोषणा एमीने केली होती. 2019च्या मे महिन्यात जॉर्ज व एमीचा धुमधडाक्यात साखरपुडा झाला होता आणि याचवर्षी सप्टेंबर महिन्यात एमीने मुलाला जन्म दिला होता.मुलगा एंड्रियास याच्या जन्मानंतर एमी व जॉर्ज दोघेही आनंदात होते. दोघांनीही सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटोही शेअर केला होता. पण आता अचानक एमीने जॉर्जचे सगळे फोटो डिलीट केल्याने या कपलमध्ये सर्व काही ऑल वेल नसल्याचे मानले जात आहे. जॉर्ज हा ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा आहे. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे.  एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली. 

साखरपुड्याचा फोटोही केला डिलीटएमीने जॉर्ज सोबतचे सगळे क्षण, त्याचे फोटो इन्स्टावर शेअर केले होते. अगदी जॉर्जने प्रपोज केला तो क्षण, दोघांच्या साखरपुड्याचा क्षण आणि मुलाच्या जन्मानंतरचे क्षण सगळेकाही फोटोरूपात तिने पोस्ट केले होते. पण आता हे सर्व फोटो तिने डिलीट केले आहेत. अलीकडे एमीने मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता. मात्र यात जॉर्ज नव्हता.

एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. अर्थात 2012 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते.   एमीने 2012 मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर 2016 मध्ये  तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते.   ‘2.0’  या चित्रपटात ती मेगास्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती.

टॅग्स :एमी जॅक्सन