‘ब्लॅक’मध्ये अमिताभ बच्चन यांची विद्यार्थी बनली होती ‘ही’ अभिनेत्री, आता याला करते डेट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 16:40 IST
२००५ या वर्षात आलेल्या ‘ब्लॅक’ या सुपरहिट चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी चाइल्ड आर्टिस्ट तुम्हाला आठवते काय? ...
‘ब्लॅक’मध्ये अमिताभ बच्चन यांची विद्यार्थी बनली होती ‘ही’ अभिनेत्री, आता याला करते डेट!!
२००५ या वर्षात आलेल्या ‘ब्लॅक’ या सुपरहिट चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी चाइल्ड आर्टिस्ट तुम्हाला आठवते काय? होय, तुम्ही अगदी बरोबर विचार केला आहे. आयशा कपूर हिने ही चाइल्ड आर्टिस्टची भूमिका केली होती. आयशाला चित्रपटात दमदार अभिनय आणि बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री या कॅटेगिरीत फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. वयाच्या ११व्या वर्षात डेब्यू करणारी आयशा आता २३ वर्षांची झाली असून, आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. आयशा अदम ओबरॉय नावाच्या एका तरुणाला डेट करीत असून, त्याच्यासोबतचे काही फोटो ती नियमितपणे सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. वास्तविक अदम कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहे, याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, आयशा आर्ट स्टूडेंट असून, न्यू यॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ती एक बिझनेसवुमनदेखील आहे. तिच्या आईसोबत ती एसेसरी ब्रॅँच चालवित आहे. ‘ब्लॅक’नंतर आयशाने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच तिला अभिनयापासून दूर जावे लागले. ज्यावेळी तिने ‘ब्लॅक’मध्ये काम केले, तेव्हा आयशा केवळ दहा वर्षांची होती. त्यामुळेच तिने आपल्या शालेय शिक्षणावर अधिक भर दिला. बातमी तर असेही समोर येत आहे की, आयशा शेखर कपूरच्या ‘पानी’ या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. दरम्यान, ‘ब्लॅक’ या चित्रपटालला बॉक्स आॅफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. महानायक अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या अभिनयाचे त्यावेळी सर्वत्र कौतुक केले होते. त्याचबरोबर आयशाने बालकलाकार म्हणून सरस भूमिका साकारली होती. भविष्यात आयशा बॉलिवूडमध्ये लंबी पारी खेळेल अशी चर्चाही त्याकाळी रंगली होती. आता आयशा पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार की, बिझनेसवुमन म्हणून काम करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.