Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एक-एक करून सर्वजण सोडून जात आहेत..." अमिताभ बच्चन भावुक, 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:42 IST

अमिताभ बच्चन भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. ते चाहत्यांसोबत जोडलेलं राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात.  दररोज सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना चाहत्यांसमोर व्यक्त करतात, यासोबतच ते चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील अपडेट्सही सांगतात. यामुळे ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. आता अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमिताभ बच्चन सध्या एका अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. नुकत्याच एका जवळच्या मित्राच्या निधनाने बिग बींना मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या मनातील दुःख व्यक्त केले आहे. 

८३ वर्षीय अमिताभ यांनी आपल्या मित्राच्या आठवणीत लिहिलेले शब्द वाचून चाहत्यांचेही डोळे पाणावले आहेत. १२ मार्च रोजी दुपारी ३:५० वाजता लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, "आणखी एक प्रिय मित्र गमावला. तो अमर्याद प्रेम आणि विनोदाने भरलेला माणूस होता. कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची कला त्याला अवगत होती. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचे. तो आता आपल्यात नाही, यावर माझा विश्वासच बसत नाहीये".

अमिताभ यांची ही भावनिक पोस्ट पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. "मित्राच्या आत्म्याला शांती मिळो, सर स्वतःची काळजी घ्या," अशा अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्टवर येत आहेत. 

अमिताभ बच्चन यांच्यासाठी गेल्या काही महिन्यांचा काळ अत्यंत क्लेशदायक राहिला आहे. २०२५ मध्ये त्यांनी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि 'शोले'मधील जोडीदार धर्मेंद्र यांना गमावले. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी 'ही मॅन' धर्मेंद्र यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले होते. त्यासोबतच, जाहिरात क्षेत्रातील दिग्गज आणि अमिताभ यांचे जुने मित्र पियुष पांडे यांचेही ऑक्टोबर २०२५ मध्ये निधन झाले. पियुष पांडे यांनीच बिग बींच्या लोकप्रिय 'पोलिओ' मोहिमेची रचना केली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amitabh Bachchan's emotional post about losing friends goes viral.

Web Summary : Amitabh Bachchan mourns the loss of a close friend, expressing his grief in a blog post. He reflects on the friend's positive spirit and humor. Bachchan also recently lost other close friends, including Dharmendra and Piyush Pandey, making it a difficult time.
टॅग्स :अमिताभ बच्चन