Join us

आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा मेगा प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 18:18 IST

अमिताभ बच्चन यांची अनेक ठिकाणी मालमत्ता आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीयचं नेहमी चर्चेत असतं. अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला असून सध्या ते मुंबईत राहतात. मात्र अनेक ठिकाणी त्यांची घर, मालमत्ता आहे. राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी 14.5 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केला होता. आता त्यांनी पुन्हा अलिबाग येथे कोट्यावधी रुपयांची जमीन घेतली आहे. 

अमिताभ बच्चन  यांनी 'द हाउस ऑफ अभिनंदन लोढ़ा' यांच्याकडून १० हजार स्क्वेअर फूट एवढी जागा खरेदी केली आहे. 'ए अलिबाग' हा प्रोजेक्ट मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आला होता.  २० एकरावर पसरलेला हा प्रोजेक्ट आहे. गेल्या आठवड्यात या व्यवहाराची नोंद झाल्याची माहिती आहे. या  जमिनीची किंमत १० कोटी आहे. लक्झरी रिट्रीट आणि गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्या लोकांसाठी अलीबाग हे पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. मुंबईपासून जवळ असल्यामुळे सेलेब्सची ती पहिली पसंत बनलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील कामाचं त्यांना फक्त 500 रुपये मानधन मिळालं होतं. पण आज एका चित्रपटासाठी बिग बी 6 कोटी रुपयांचं मानधन घेतात. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन 3198 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी  'द शरयू प्रोजेक्ट'मध्ये अयोध्येत 14.5 कोटींचा एक प्लॉट खरेदी केला होता. 

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाअलिबागमुंबईअयोध्या