Join us

​अभिताभ बच्चन बनणार सुपरहिरो ‘अ‍ॅस्ट्रा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 16:07 IST

Amitabh Bachchan's animated superhero series Astra Force; ‘अ‍ॅस्ट्रा फोर्स’मध्ये अमिताभ बच्चन अ‍ॅनिमेटेड सुपरहिरो ‘अस्ट्रा’ यांच्या रुपात जग रक्षण करताना दिसणार आहेत. ‘अ‍ॅस्ट्रा’ला खुद्द अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता अ‍ॅनिमेटेड सुपरहिरोच्या रुपात दिसणार आहेत. डिज्ने इंडियानिर्मित ‘अ‍ॅस्ट्रा फोर्स’ या अ‍ॅनिमेशन मालिके त अमिताभ बच्चन सुपरहिरो साकारणार आहे. ‘अ‍ॅस्ट्रा फोर्स’मध्ये अमिताभ बच्चन अ‍ॅनिमेटेड सुपरहिरो ‘अस्ट्रा’ यांच्या रुपात जगाचे रक्षण करताना दिसणार आहेत. ‘अ‍ॅस्ट्रा’ला खुद्द अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेला ‘अँग्री यंग मॅन’ बॉलिवूडमध्ये लिजेंड मानला जातो. ‘अजूबा’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी सुपरहिरो साकारला होता. याशिवाय बच्चेकंपनीला डोळ्यांपुढे ठेऊन साकारण्यात आलेल्या ‘भूतनाथ’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता बिग बी नव्या स्वरुपात प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. ‘डिज्ने कॉमिक्स’ने अमिताभ यांच्या प्रतिमेला ध्यानात ठेऊन ‘अ‍ॅस्ट्रा’ या सुपरहिरोची निर्मिती केली आहे. ‘अ‍ॅस्ट्रा’ हेअमिताभ बच्चन यांचे प्रतिरूप आहे. या सुपरहिरो सिरीजची घोषणा डिज्ने इंडियाने अमिताभ बच्चन यांच्या 74 व्या वाढदिवशी केली होती. अ‍ॅस्ट्रासोबत नील आणि तारा दिसणार असून या तिघांनी एकत्र येत अ‍ॅस्ट्रा फोर्स तयार केली आहे. जगाचा विध्वंस करणाºया राक्षसांचा अ‍ॅस्ट्रा फोर्स विनाश करणार आहे. नील आणि तारा अपघाताने अ‍ॅस्ट्राला जागृत करतात, व जगाला वाचविताना दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अ‍ॅस्ट्रा फोर्सचा लूक शेअर केला आहे. ‘‘बाढूऽऽऽबा! मी आता अ‍ॅनिमेशनमध्ये.... याहू’’ असे त्यांनी लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासाठी 2016 हे वर्ष लकी म्हणावे लागेल. यावर्षी प्रदर्शित झालेला ‘पिंक’ या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेची प्रशंसा झाली. संयुक्त राष्ट्र संघात याचे स्पेशन स्क्रिनिंग होणार आहे. आता ते अ‍ॅनिमेशनच्या माध्यामतून सुपरहिरोच्या रुपात लहान मुलांचे मनोरंजन करताना दिसतील.