Join us

"सर्वात आधी त्या..." अमिताभ बच्चन यांनी 'X' वर पोस्ट करत मागितली माफी, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:57 IST

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

Amitabh Bachchan  Apology : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. गेल्या चार दशकांपासून ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. चित्रपटांसोबतचं अमिताभ गेल्या दोन दशकांहून अधिक काळ 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या शोचं होस्टिंग करत आहेत. 'केबीसी ज्यूनियर' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये गांधीनगरचा पाचवीतील विद्यार्थी इशित भट सहभागी झालेला. अमिताभ यांच्याशी बोलताना काहींना त्या मुलाची बोलण्याची शैली आत्मविश्वासपूर्ण तर, काहींनी उद्धट होती, असे वाटलं. सोशल मीडियावर या मुलावर आणि त्याच्या पालकांवर टीका करण्यात आली. या प्रकरणामुळे अमिताभ सध्या चर्चेत आहेत. अशातच अमिताभ यांच्या एका पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अमिताभ यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून माफी मागितली. अमिताभ यांनी गेल्या १ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यादिवशी जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र,  चाहत्यांच्या शुभेच्छांना प्रतिसाद द्यायला उशीर झाल्यानं अमिताभ यांनी पोस्ट करत माफी मागितली आहे. तसेच यामागचे खरे कारण सांगितले, ज्यामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमिताभ बच्चन यांनी  'X' वर पोस्ट शेअर करत लिहिले, "सर्वप्रथम मी त्या सर्वांची माफी मागतो, ज्यांनी ११ ऑक्टोबरला, माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या पण, त्यांना माझ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मला खेद आहे. माझा मोबाईल अचानक नीट काम करणं बंद झाला आहे, त्यामुळे मी प्रत्युत्तर देऊ शकलो नाही... सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि प्रेम". बिग बींच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.

English
हिंदी सारांश
Web Title : Amitabh Bachchan Apologizes on 'X' for Birthday Wish Delay: Here's Why

Web Summary : Amitabh Bachchan apologized on 'X' for delayed birthday wish responses. His mobile malfunctioned, preventing him from replying promptly. He expressed gratitude to fans.
टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडकौन बनेगा करोडपती