Join us

पारदर्शी टॉप घालून फोटो शेअर केल्याने अमिशा पटेल झाली पुन्हा ट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 17:03 IST

अभिनेत्री अमिशा पटेल पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ट्रोलर्सनी तिच्या या फोटोवरून चांगलाच समाचार घेतला. सातत्याने तिच्या फोटोला उलटसुलट कॉमेण्ट दिल्या जात आहेत.

अभिनेत्री अमिशा पटेल अन् युजर्समध्ये जणूकाही कोल्ड वॉरच सुरू आहे. कारण तिने कुठलाही फोटो अथवा पोस्ट शेअर केल्यास, त्यास युजर्सकडून सपशेल नापसंत केले जाते याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. त्याचे झाले असे की, अमिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पांढºया रंगाचा पारदर्शी टॉप परिधान करून फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तिचे इनरवियर स्पष्टपणे दिसत आहे. याच मुद्द्यावरून ट्रोलर्सनी तिला असे काही धारेवर धरले की, तिच्या फोटोवर अक्षरश: उलटसुलट कॉमेण्ट्सचा पाऊस पाडला. एका युजरने लिहिले की, पारदर्शी ड्रेस परिधान करणे चुकीचे आहे. याव्यतिरिक्त अनेक युजर्सनी तिला अशाप्रकारचे सल्ले दिले. काहींनी तर शिवीगाळ करणाºया कॉमेण्ट लिहिल्या. एका युजर्सने चक्क तिला इनरवियरचा ब्रॅण्ड विचारला. तर काहींनी इनरवियरच्या विजबिलिटीवरून तिची खिल्ली उडविली. एका युजरने लिहिले की, ‘तू वेडी आहेस काय? पांढºया रंगाच्या टॉपखाली काळ्या रंगाची ब्रा कोणी परिधान करतेय काय? अमिशाने हा फोटो शेअर करताच दोन तासांतच जवळपास १८ हजार युजर्सनी त्यास लाइक केले. तर कित्येकांनी त्यास कॉमेण्ट दिल्या. दरम्यान, अमिशाने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘...’ वास्तविक अमिशाला पहिल्यांदाच अशाप्रकारे ट्रोल केले असे नाही तर यापूर्वीदेखील तिला तिच्या फोटोंवरून ट्रोल करण्यात आले आहे.  अमिशा गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीमधून गायब आहे. कारण कित्येक काळापासून तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ती चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करून चर्चेत राहणे पसंत करते. परंतु ही चर्चा नकारात्मक असल्याने तिला युजर्सच्या संतापाचा सामना करावा लागतो, हेही तेवढेच खरे आहे.