Join us
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच येणार 'गदर ३', अमिषा पटेलने दिलं अपडेट, म्हणाली "प्रेक्षकांचे प्रेम, देवाच्या आशीर्वादामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:51 IST

अमिषा पटेलनं 'गदर ३'बद्दल मोठी अपडेट दिली आहे.

'गदर' या पहिल्या भागाच्या यशानंतर पुन्हा कधी तारा सिंह आणि सकिनाला मोठ्या पडद्यावर पाहता येईल असे सिनेरसिकांना वाटले नव्हते. पण ती संधी पुन्हा  मिळाली. २०२३ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.  फक्त ६० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या 'गदर २'नं जगभरात ६९१ कोटी रुपयांचा जबरदस्त गल्ला केला. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीन वर्षे उलटली आहेत. दरम्यान आता अमिषा पटेलनं तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

'गदर २'च्या प्रचंड यशानंतर आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. अमिषा पटेलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत 'गदर ३' नक्कीच बनवला जाईल, अशी पुष्टी केली आहे. अमिषाने म्हटले आहे की, "गदर ३ नक्कीच येणार आहे आणि जेव्हा तो येईल, तेव्हा थिएटरमध्ये धुमाकूळ माजेल. प्रेक्षकांचे प्रेम आणि देवाच्या आशीर्वादामुळे 'गदर' सारख्या ब्रँडसाठी ५०० कोटींचे कलेक्शन आता एक सामान्य आकडा झाला आहे". यावेळी चित्रपटाचा आवाका आणि पटकथा पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि 'स्फोटक' असेल, असेही तिने स्पष्ट केले.

'गदर ३' व्यतिरिक्त अमिषा पटेल तिच्या गाजलेल्या 'हमराज' चित्रपटाच्या सिक्वेलमुळेही चर्चेत आहे. निर्माते रतन जैन यांनी 'हमराज २' साठी योग्य पटकथेचा शोध सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात अमिषाचे एकापाठोपाठ एक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Gadar 3' Confirmed: Ameesha Patel Shares Exciting Update with Fans

Web Summary : Ameesha Patel confirmed 'Gadar 3' is happening after 'Gadar 2's success. She anticipates huge box office numbers, exceeding 500 crore, fueled by audience love. The film's scale and script will be grander than before. 'Hamraaz 2' is also in development.
टॅग्स :अमिषा पटेलसनी देओल