Join us

Allu Arjun sweetest welcome from Daughter: अल्लू अर्जुन १६ दिवसांनी परतला घरी, लेकीने केलं 'गोड स्वागत'; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल Aww, So Cute!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:36 IST

अल्लू अर्जुन सध्या पुष्पा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप दिवस घरापासून दूर होता.

Allu Arjun sweetest welcome from Daughter: साऊथ स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या अभिनयाने सजलेला पुष्पा (Pushpa: The Rise) सिनेमा देशभरात धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटातील काही डायलॉग्स, गाणी आणि डान्सच्या स्टेप्स भारताबाहेरही लोकप्रिय होताना दिसत आहेत. तरूण पिढी तर अल्लू अर्जुनच्या अभिनयाच्या आणि 'रफ अँड टफ' अँटीट्यूटच्या चांगलीच प्रेमात पडली आहे. पण अल्लू अर्जुन मात्र सध्या एका वेगळ्याच गोष्टीच्या प्रेमात पडल्याचं दिसतंय.

अल्लू अर्जुन आणि पुष्पा सिनेमातील इतर मंडळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि यशासाठी देश-विदेशात फिरतीवर आहेत. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन दुबईत होता. तेथील एक फोटो त्याने शेअर केला होता. पण तेथे तो प्रमोशन साठी गेला होता की विश्रांतीसाठी गेला होता, याबद्दल स्पष्टता नाही. असं असलं तरी अल्लू अर्जुन अखेर १६ दिवसांनंतर दुबईहून घरी परतला. त्यावेळी त्याची लहान मुलगी अरहा हिने त्याचं खूपच गोड पद्धतीने स्वागत केलं.

अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून, त्याच्या मुलीने त्याचे घरी नक्की कसे स्वागत केले हे सांगणारा एक फोटो शेअर केला. अरहाने फुलांची सजावट केली होती. फुलांच्या सजावटीमध्ये 'वेलकम नाना' अशी अक्षरं लिहिली होती. हा फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला असून त्यावर तुफान लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, पुष्पा चित्रपट १७ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाला सर्वच स्तरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सेलिब्रिटींपासून ते समीक्षकांपर्यंत आणि चाहत्यांपर्यंत सगळेच 'पुष्पा'चे फॅन झाले आहेत. त्यामुळे 'पुष्पा: द रूल' हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पारश्मिका मंदाना