Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज फ्रेन्डच्या लग्नात बेधूंद नाचली आलिया भट्ट! पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 13:17 IST

आलिया भट्ट सध्या जाम बिझी आहे, यात काहीही शंका नाही. पण या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आलिया पोहोचली ती तिची बेस्ट फ्रेन्ड कृपा मेहता हिच्या लग्नात.

आलिया भट्ट सध्या जाम बिझी आहे, यात काहीही शंका नाही. पण या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आलिया पोहोचली ती तिची बेस्ट फ्रेन्ड कृपा मेहता हिच्या लग्नात. होय, आलियाने या लग्नात केवळ हजेरीच लावली नाही तर धम्माल मस्तीही केली. जोधपूर येथे पार पडलेल्या या डेस्टिनेशन वेडिंगमधील आलियाचे  फोटो आणि व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. विशेषत: आलियाचा एक डान्स व्हिडिओ तर आग पसरावी तसा पसरतो आहे. होय, या व्हिडिओत आलिया ‘हवा...हवा...ऐ हवा...’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसतेस.कृपाच्या हळद व मेहंदी फंक्शनमध्ये आलिया पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. जोधपूरला गत काल हे फंक्शन पार पडले. यानंतर संगीत फंक्शनमध्ये आलियाने ‘हवा...हवा...ऐ हवा...’ या गाण्यावर डान्स केला.  या लग्नात आलिया पोहोचली अन् सगळ्यांचे लक्ष तिने वेधून घेतले. पिंक सूटमध्ये ती अतिशय गोड दिसत होती.आलियाचा ‘राजी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रोड्यूस करतो आहे. यात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे.  ‘राजी’मध्ये आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिका-याशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाºयांना देते, असे याचे कथानक आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे.   सध्या आलिया ‘गली बॉय’ या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरचे आलियाचे काही फोटो अलीकडे व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये आलिया एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसतेय. ‘गली बॉय‘मध्ये एका स्ट्रिट रॅपरची कथा असल्याचे कळतेय. जी एका रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेली आहे. ही कथा गेल्या अनेक वर्षांपासून जोयाच्या डोक्यात होती. या चित्रपटासाठी आधी रणबीर कपूरचे नाव चर्चेत होते. यानंतर वरूण धवनच्या नावाचीही चर्चा झाली आणि सरतेशेवटी रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रणवीर व आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.