Join us

‘सर्कस’ बाबतीतील ‘त्या’ सर्व अफवाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 12:46 IST

परिणीती चोप्रा ही सध्या आयुषमान खुराणासोबत ‘मेरी प्यारी बिंदू’ हा चित्रपट साकारत आहे. तसेच ती सुशांतसिंग राजपूतसोबत ‘ताकादुम’ चित्रपटातही ...

परिणीती चोप्रा ही सध्या आयुषमान खुराणासोबत ‘मेरी प्यारी बिंदू’ हा चित्रपट साकारत आहे. तसेच ती सुशांतसिंग राजपूतसोबत ‘ताकादुम’ चित्रपटातही शुटींग करत आहेत. पण चर्चा अशीही होती की, ती कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस दिग्दर्शित ‘सर्कस’ मध्ये काम करणार आहे.पण, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिणीतीने ‘मेरी प्यारी बिंदू’ आणि ताकादुमशिवाय दुसरा कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही, हे कळाले. परिणीती सध्या यूएसला ‘ड्रीम टीम टूर’ साठी आलेली असून यूएसमध्ये लाईव्ह शोज एन्जॉय करत आहे.