आलिया भट (Alia Bhatt) बॉलिवूडमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यात तिने चांगला समतोल साधला आहे. एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले, अवॉर्ड्सही पटकावले. तर वैयक्तिक आयु्ष्यात कपूर घराण्याची सून झाली आणि एका गोंडस मुलीला जन्मही दिला. आलियाच्या यशाचं नेहमीच कौतुक केलं जातं. तर तिची बहीण शाहीन भटही सध्या चर्चेत आहे. शाहीनलाही तिचा जीवनसाथी मिळाल्याचं दिसत आहे. नुकतंच आलियाने आई आणि बहिणीसह व्हेकेशन एन्जॉय केलं. यावेळी शाहीनच्या बॉयफ्रेंडकडे सर्वांचं लक्ष गेलं. कोण आहे आलियाचा होणारा भावोजी?
आलिया भट नेहमी कुटुंबासोबत फिरायला जाते. तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिची बहीण शाहीन भटने नुकतीच त्यांच्या व्हेकेशनची झलक दाखवली. तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. आई सोनी राजदान आणि आलियासोबत तिचा फोटो आहे. यात तिचा बॉयफ्रेंडही दिसत आहे. मरुन रंगाच्या आऊटफिटमध्ये शाहीन सुंदर दिसत आहे. तर आकाशी रंगाच्या लाँग वीनपीसमध्ये आलिया क्युट दिसत आहे.
कोण आहे शाहीनचा बॉयफ्रेंड?
फोटोत शाहीनच्या बाजूला निळ्या रंगाच्या शर्टमध्ये तिचा बॉयफ्रेंड आहे. ईशान मेहरा असं त्याचं नाव आहे. तो सर्टिफाईड फिटनेस कोच आहे. तसंच माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटूही आहे. जिममधील त्याचे वर्कआऊटचे व्हिडिओ तो शेअर करत असतो. शाहीननेही महिन्यांपूर्वी त्याच्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
शाहीन भट आलियाची मोठी बहीण आहे. शाहीन लेखिका आणि निर्माती आहे. सुरुवातीला शाहीनने डिप्रेशनचा सामना केला होता. त्यातून ती कशी बाहेर आली आणि तिला आपल्या बहिणीची कशी साथ मिळते यावर अनेकदा तिने भावना व्यक्त केल्या आहेत.